Mitali Mayekar : मिताली पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर, बोल्ड फोटो पोस्ट करुन म्हणाली, "आपली संस्कृतीचं ज्ञान ..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 08:46 AM2023-05-19T08:46:23+5:302023-05-19T08:47:18+5:30

नुकताच मितालीने मोनॉकिनी परिधान केलेला एक फोटो पोस्ट केला असून  त्याचं कॅप्शन जोरदार आहे.

mitali mayekar marathi actress post bold photo with caption saying dont try to give cultural knowledge | Mitali Mayekar : मिताली पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर, बोल्ड फोटो पोस्ट करुन म्हणाली, "आपली संस्कृतीचं ज्ञान ..."

Mitali Mayekar : मिताली पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर, बोल्ड फोटो पोस्ट करुन म्हणाली, "आपली संस्कृतीचं ज्ञान ..."

googlenewsNext

मराठी अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) सध्या पती सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) बरोबर युरोप टूरवर आहे. नुकताच दोघांनी स्पेनमध्ये स्काय डायव्हिंग केल्याचा व्हिडिओ पोस्ट केला. त्यांच्या या परदेशातील व्हॅकेशनचे फोटो चाहते खूप पसंत करत आहेत. सिद्धार्थ तर नेहमीप्रमाणेच कूल लुकमध्ये दिसतोय तर मितालीचा सुद्धा बोल्ड अवतार पाहायला मिळतोय. नुकताच मितालीने मोनॉकिनी परिधान केलेला एक फोटो पोस्ट केला असून  त्याचं कॅप्शन जोरदार आहे.

स्पेनमध्ये बीचवर मिताली बोल्ड लुकमध्ये दिसली. प्रिंटेड केशरी रंगाच्या मोनॉकिनी मध्ये तिने फोटो पोस्ट केला. मोकळे केस आणि लॉंग इअररिंग्समध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. आता मराठमोळ्या अभिनेत्रीने असा बोल्ड फोटो पोस्ट केला म्हणजे कमेंट्स तर येणारच. आपल्या संस्कृतीला हे शोभणारं नाही अशा कमेंट्स येतील हे मितालीलाही अपेक्षित होतंच. म्हणून तिने आधीच एक भन्नाट कॅप्शन लिहित ट्रोलर्सची बोलती बंद केली. तिने लिहिले, " मी आज सकाळी उठताच कॉन्ट्रोव्हर्सी होईल असं काही केलं आहे. आता कमेंट सेक्शनमध्ये आपली संस्कृतीचं ज्ञान देण्याचं प्रयत्नही करु नका तुमची तुम्हालाच लाज वाटेल."

मितालीचा हा फोटो सिद्धार्थनेच काढला आहे. मितालीने असं कॅप्शन दिल्यानंतरही अनेकांनी तिला ट्रोल केलंच आहे. एकाने कमेंट करत लिहिले, "काही नाही घातलं तरी आमचं काय जाणार आहे ...? That's ur choice... बाकी महाराष्ट्रीय संस्कृतीच आणि तुझं काही देणंघेणं नाही हे तर पोस्ट वरून सिद्ध झालंच ...."

मितालीने याआधीही अंघोळ करतानाचा पाठमोरा फोटो पोस्ट केला होता. त्यावेळीही तिला चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. यावेळी मात्र तिने आधीच कॅप्शनमधून ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे.

Web Title: mitali mayekar marathi actress post bold photo with caption saying dont try to give cultural knowledge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.