फ्रान्समधील 'या' ठिकाणी धावता धावता धपकन पडली, मिताली मयेकरने शेअर केला मजेशीर Video,
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 17:51 IST2024-07-20T17:50:43+5:302024-07-20T17:51:34+5:30
एके ठिकाणी धावत धावत व्हिडिओ काढला जावा यासाठी ती पळत होती तेव्हा धपकन पडली.

फ्रान्समधील 'या' ठिकाणी धावता धावता धपकन पडली, मिताली मयेकरने शेअर केला मजेशीर Video,
सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि मिताली मयेकर (Mitali Mayekar) नुकतेच युरोप ट्रिपवर होते. जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली, स्पेन, पॅरिसमधील मनमोहर दृष्य त्यांनी कॅमेऱ्यात कॅप्चर केले. त्यांचे फोटो पाहून अनेकांना आपणच युरोप ट्रीप केल्याचा भास झाला असेल. मिताली मयेकर याही ट्रीपमध्ये एकदम बोल्ड अँड सेक्सी लूकमध्ये दिसली. मात्र एके ठिकाणी धावत धावत व्हिडिओ काढला जावा यासाठी ती पळत होती तेव्हा धपकन पडली. हा व्हिडिओ तिने स्वत:च शेअर केला आहे.
फ्रान्स दौऱ्यावर असताना सिद्धार्थ आणि मितालीने मॉन्ट सेंट मिशेल या ठिकाणी भेट दिली. बाहेरुन डिझ्नी आणि आतून हॉगवर्ट्स सारखं दिसणारं हे ठिकाण. इथे भेट देण्याचं दोघांचंही स्वप्न होतं. मितालीला या ठिकाणी खास व्हिडिओ काढायचा होता. धावत धावत ती मॉन्ट सेंट मिशेलच्या दिशेने जात आहे असं तिला दाखवायचं होतं. मागून सिद्धार्थ तिचा व्हिडिओ काढत होता. मात्र धावता धावता मिताली धपकन खालीच पडली. मितालीच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांना हसू आवरत नाहीए. व्हिडिओला तिने कॅप्शनही मजेशीर दिलं आहे. ती लिहिते, 'मी खरोखरंच या ठिकाणाच्या प्रेमात पडले. मला गवतावर धावतानाचा सुंदर, ड्रीमी व्हिडिओ हवा होता. जास्तच मागितलं का मी? #epicfail
सिद्धार्थ आणि मिताली २३ दिवसात ४ देश आणि १६ जागी फिरले. आता घरच्या जेवणाची आठवण येतीये म्हणत दोघांनी परत येत आहोत सांगितले. मराठी सिनेसृष्टीतील या कपलला फिरण्याची प्रचंड आवड आहे हेच यातून दिसतंय. तसंच ही ट्रीप अरेंज करण्याची सर्व जबाबदारी मिताली घेते तेही कमीत कमी खर्चात ती सर्व डील्स करते असंही सिद्धार्थ एका मुलाखतीत म्हणाला होता.