मिथीला पालकरचा हा लूक तुम्हाला करेल घायाळ, साडीमधील तिच्या अदांची सोशल मीडियावर चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 11:46 IST2018-11-03T11:44:03+5:302018-11-03T11:46:42+5:30
अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान मिळवणाऱ्या मिथीलाने काही दिवसांपूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीतही पाऊल ठेवलं. 'कारवाँ' या सिनेमातून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या सिनेमातील तिच्या अभिनयाचेही सर्वत्र कौतुक झाले.

मिथीला पालकरचा हा लूक तुम्हाला करेल घायाळ, साडीमधील तिच्या अदांची सोशल मीडियावर चर्चा
आजच्या तरुणाईचं प्रतिनिधीत्व करणारी अभिनेत्री म्हणजे मिथीला पालकर. एक उत्स्फूर्त आणि कायमच आपल्या आनंदी चेहऱ्यानं घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते. इतकेच नाही तर आपल्या अभिनयाची जादूही मिथीलाने दाखवून दिली आहे. मुरांबा या आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमात तिने दर्जेदार अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. पहिल्या सिनेमाला मिळालेल्या यशा नंतर तिने मागे वळून पाहिलं नाही. माझा हनीमूनमध्येही तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान मिळवणाऱ्या मिथीलाने काही दिवसांपूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीतही पाऊल ठेवलं. 'कारवाँ' या सिनेमातून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या सिनेमातील तिच्या अभिनयाचेही सर्वत्र कौतुक झाले.
एक उत्तम अभिनेत्री असल्याचे सिद्ध करणारी मिथीला आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग आहे. कोणत्या कार्यक्रमात कशी स्टाईल आणि फॅशन असावी हे ती उत्तमरित्या जाणते. विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते. नुकतंच तिने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत तिने हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे. या साडीत तिचं सौंदर्य आणखीनच खुलून गेल्याचे दिसून येत आहे.
तिच्या या फोटोला फॅन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत. मिथीला कप साँगमुळे अल्पवधीतच साऱ्यांची लाडकी बनली होती. तिने वेबविश्वात अक्षरक्षा धुमाकूळ घातला होता. कपच्या तालावरील तिचे ‘हिची चाल तुरु तुरु...’ नेटिझन्ससह रसिकांनाही भावले होते. मात्र तेव्हापासून एक अभिनेत्री म्हणून तिने मिळवलेले यश नक्कीच कौतुकास्पद म्हणावे लागेल.