मोहन जोशी आणि स्मिता जयकर यांच्यातील 'रुसवा फुगवा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 17:27 IST2019-12-02T17:24:37+5:302019-12-02T17:27:09+5:30

अजय फणसेकर दिग्दर्शित 'सिनिअर सिटीझन' हा चित्रपट वरिष्ठ नागरिक आणि आजची तरुण पिढी यांच्यातील नात्याचे भेदक चित्रण करणारा आहे.

Mohan Joshi and Smita Jaikar starring In Senior Citizen Marathi Movie | मोहन जोशी आणि स्मिता जयकर यांच्यातील 'रुसवा फुगवा'

मोहन जोशी आणि स्मिता जयकर यांच्यातील 'रुसवा फुगवा'

  असे म्हणतात, प्रेमाला वयाचे बंधन नसते. आणि हे अगदी खरे आहे . याचाच प्रत्यय 'सिनियर सिटीझन' या चित्रपटातील 'रुसवा फुगवा' हे रोमँटिक गाणे पाहताना येतो . प्रेम फक्त तरुण तरुणींमध्येच असते, असा अनेकांचा गैरसमज असून  हाच गैरसमज 'रुसवा फुगवा' गाण्यातून बदलणार आहे.  मोहन जोशी आणि स्मिता जयकर यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्यातून त्यांच्यातील प्रेम, एकमेकांविषयी असलेली ओढ सहज जाणवते. आपल्या रुसलेल्या बायकोला मनवण्यासाठी मोहन जोशी यांचे सुरु असलेले प्रयत्न  आणि त्यांच्यातील गोड,अतूट  नाते आपल्याला या गाण्यातून दिसते. उतारवयात खुलणारे हे प्रेम तरुणांनाही प्रेरित करणारे आहे. या रोमँटिक गाण्याचे संगीतकार अभिजित नार्वेकर आहेत . तर अंबरीश देशपांडे यांनी  हे गाणे लिहिले असून विनय मांडके यांनी  गायले आहे.

अजय फणसेकर दिग्दर्शित  'सिनिअर सिटीझन' हा चित्रपट वरिष्ठ नागरिक आणि आजची तरुण पिढी यांच्यातील नात्याचे भेदक चित्रण करणारा आहे.  या चित्रपटात मोहन जोशी निवृत्त लष्कर अधिकारी अभय देशपांडे यांची भूमिका साकारताना दिसणार असून या चित्रपटात स्मिता जयकर, सुयोग गोऱ्हे, अमृता पवार, स्नेहा चव्हाण, श्रुती बोराडीया, किरण तांबे, अमोल जाधव, गौरीश शिपूरकर, हर्षल पवार, आशिष पवार, कमलेश सावंत या   चित्रपटात दिसणार आहेत. येत्या १३ डिसेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.       

माधुरी नागानंद आणि विजयकुमार नारंग निर्मित 'सिनियर सिटीझन' या चित्रपटात क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून राजू सावला यांनी तर एक्झिक्टिव्ह प्रोड्युसर म्हणून प्रमोद सुरेश मोहिते यांनी काम पहिले आहे.

Web Title: Mohan Joshi and Smita Jaikar starring In Senior Citizen Marathi Movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.