मोहन जोशी यांच्या नवीन सिनेमाचा मुहूर्त संपन्न, या कलाकारांच्या आहेत भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 07:30 AM2019-10-17T07:30:00+5:302019-10-17T07:30:00+5:30
प्रित अधुरी नावावरून ही लवस्टोरी असली तरी कथेमध्ये रोमान्स, सस्पेन्स, इमोशन्स, अॅक्शन सर्व काही आहे. प्रेक्षकांना आवडणारा मसाला यात आहे. असे दिग्दर्शक साजिद अली यांनी सांगितले.
'प्रित अधुरी' चित्रपटाचा आणि गीत ध्वनिमुद्रणाने मुहूर्त संपन्न झाला. संगीतकार राजेश घायल यांनी संगीतबद्ध केलेल्या प्रेमगीताला सुप्रसिद्ध गायक कुणाल गांजावाला यांनी हिन्दी मराठी गीताला आवाज दिला. यावेळी दिग्दर्शक एम. साजिदअली, अभिनेता प्रवीण वाडकर, अभिनेत्री सिया पाटील, क्षमा निनावे , शशिकांत पवार, लेखक प्रकाशमणी तिवारी, गीतकार तरखान, अभय पोतदार, दिग्दर्शक दिलीप प्रधान, प्रवीण शेटये, रजनीका, अमित सूर्या, आशा चोटाणी आदि चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर निर्मात्यांना शुभेच्छा देण्यासाठी हजर होती.
प्रित अधुरी नावावरून ही लवस्टोरी असली तरी कथेमध्ये रोमान्स, सस्पेन्स, इमोशन्स, अॅक्शन सर्व काही आहे. प्रेक्षकांना आवडणारा मसाला यात आहे. असे दिग्दर्शक साजिद अली यांनी सांगितले. दिग्दर्शक श्याम बेनेगल, आशुतोष गोवारीकर, प्रकाश झा आदि मान्यवर दिग्दर्शकाकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. नुकताच त्यांनी दिग्दर्शित केलेला कहकेशा हा हिन्दी चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहे. त्या अगोदर एक मराठी आणि विदावूट गन या इंग्रजी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अभिनेता म्हणून कोल्हापुरहुन आपले नशीब अजमावायला आलेला प्रवीण वाडकरला सुरवातीला अॅक्टिंगची कामे मिळाली नाहीत, पण डबिंगची कामे भरपूर मिळाली आहेत. आतापर्यंत प्रविणने बर्याच मराठी, हिन्दी, गुजराती, भोजपुरी, इंग्रजी चित्रपट आणि कार्टून्स फिल्म्सचे डबिंगचे काम केले आहे. काही मालिका व चित्रपटामध्ये अभिनयही केला आहे. आता मला निर्मात्यांनी प्रित अधुरी या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी सिलेक्ट केले आहे, ही माझ्यासाठी मोठी व मोलाची संधी आहे. यासाठी मी निर्माती व दिग्दर्शकांचे आभार मानतो.
प्रित अधुरी या चित्रपटात मोहन जोशी, अशोक शिंदे यांच्याही यात महत्वाची भूमिका असून बाकी कलाकार व तंत्रज्ञाची निवड होताच चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरवात होईल.