उद्या पासून बहुचर्चित ‘८वा’ यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 11:23 AM2018-01-18T11:23:32+5:302018-01-18T16:53:32+5:30

बहुचर्चित यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१८, शुक्रवार १९ जानेवारीपासून सुरु होणार आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई आणि पुणे फिल्म ...

The most famous '8th Yashwant International Film Festival' from tomorrow | उद्या पासून बहुचर्चित ‘८वा’ यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

उद्या पासून बहुचर्चित ‘८वा’ यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

googlenewsNext
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">बहुचर्चित यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१८, शुक्रवार १९ जानेवारीपासून सुरु होणार आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई आणि पुणे फिल्म फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव रंगणार आहे. प्रतिष्ठानच्या चव्हाण सेंटर मध्ये प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत हा उदघाटन सोहळा पार पडणार आहे. यावेळी चित्रपट दिग्दर्शक व निर्माता रमेश सिप्पी यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल गौरविण्यात येणार आहे. तसेच या महोत्सवात प्रतिष्ठान महोत्सवाचे संचालक जब्बार पटेल, सरचिटणीस शरद काळे, कोषाध्यक्ष हेमंत टकले, मिडिया सल्लागार नितीन वैद्य मुख्य समन्वयक महेंद्र तेरेदेसाई, समन्वयक संजय बनसोडे, यांची उपस्थित असणार आहे.
 
यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१८ महोत्सवाचे यंदा ‘८ वे’ वर्ष आहे.या महोत्सवा दरम्यान भारतीय चित्रपटसृष्टीत मोलाचं योगदान देणाऱ्यास गौरविण्यात येते.आतापर्यंत पंकज कपूर ,अनुपम खेर, वहिदा रेहमान सारख्या दिग्गज कलाकारांना गौरविण्यात आले आहे.यंदा या महोत्सवात चित्रपट रसिकांसाठी विविध भाषेतील आणि विविध देशातील काही निवडक ८५ चित्रपटांची मेजवानी आहे. महोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेले ’स्मिता पाटिल स्मृती व्याख्यान’अभिनेते सचिन खेडेकर यांच्याशी गप्पा २० जानेवारी सायंकाळी ५ वाजता. होणार आहे,
 
तसेच मोहन क्रिशनन यांचा मास्टर क्लास ‘पोस्ट प्रोडक्शन' या विषयावर २३ जानेवारी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. २२ जानेवारीला सुश्रुत वैद्य हे हिंदी चित्रपटातील गाण्यामधील सामाजिक उत्क्रांतीचे प्रतिबिंब या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. १९ जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान मुंबईकरांना जगभारतील विविध भाषातील नावाजलेले चित्रपट पाहता येणार आहे. चीन, रशिया, फ्रान्स, इराण, बेल्जियम, अर्जेंटिना, इस्त्रायल, तुर्की, चिली आदी देशांतील चित्रपट एकाच ठिकाणी पाहण्याची सुवर्णसंधी सर्वासाठी यशवंत चित्रपट महोत्सवाने उपलब्ध करुन दिली आहे.अशी माहिती महोत्सवाचे मुख्य समन्वयक महेंद्र तेरेदेसाई यांनी दिली.

Web Title: The most famous '8th Yashwant International Film Festival' from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.