"आईने मी त्यांचीच मुलगी आहे याची खात्री दिली अन्....", हेमांगी कवीने शेअर केली भन्नाट पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 01:39 PM2023-07-28T13:39:12+5:302023-07-28T13:39:27+5:30

Hemangi Kavi : हेमांगी कवीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी चर्चेत आली आहे.

"Mother assured me that I am his daughter and...", Hemangi Kavi shared an amazing post | "आईने मी त्यांचीच मुलगी आहे याची खात्री दिली अन्....", हेमांगी कवीने शेअर केली भन्नाट पोस्ट

"आईने मी त्यांचीच मुलगी आहे याची खात्री दिली अन्....", हेमांगी कवीने शेअर केली भन्नाट पोस्ट

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) अभिनयाशिवाय बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत येत असते. हेमांगी सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान हेमांगी कवीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

हेमांगी कवीने इंस्टाग्रामवर फॅमिली फोटो शेअर करत लिहिले की, ही प्रेम आणि आनंदातली माझी गुब्बारे मोंमेट. हा आमचा फॅमिली फोटो. माझे आई, बाबा, भाऊ, बहीण आणि मी! पण तुम्हांला यात चारच माणसं दिसताएत ना! अंहं, मी धरून पाच आहेत! मी खरंच आहे या फोटोत. 

ते आठवून आताही हसायला येतं!

ती पुढे म्हणाली की, लहान असताना आपण सगळ्यांनीच आपल्या आई- बाबांच्या लग्नात आपण का नव्हतो किंवा मी कुठे होतो/होते फोटो काढताना असे लाज आणणारे प्रश्न चार चौघात विचारून आपल्या घरच्यांना हैराण केलेलं आहे. पुर्वी घरात आलेल्या पाहुण्यांना, नातेवाईकांना आपले फोटो / अल्बम दाखवायची पद्धत बहुतांश घरात होती. आता हे ऐकताना ऑड वाटत असलं तरी ही पद्धत किंवा सवय म्हणूया सोशल मीडियावर आपण अबाधित ठेवलीए! तेव्हा त्या चार लोकांसमोर आपल्या पालकांची ‘आता हे कसं समजावयचं?’ झालेली नाजूक परिस्थिती आपल्याला ‘कळायला’ लागल्यावर लक्षात येते आणि ते आठवून आताही हसायला येतं! आपल्या मोठ्या भावंडांनी आपण कसे रस्त्यावरच सापडलो आणि घरी घेऊन आलो किंवा बोहारणीकडून कसं एका साडीवर घेतलं असं सांगून त्रास दिलेला आहे!

मी पण या सगळ्याला अपवाद नाही. मी या फोटोत नसण्याचं कारण विचारल्यावर माझ्या दादा-ताईने प्रथेप्रमाणे वरचीच टेप लावली! तेव्हा एवढं वाईट वाटलं होतं ना, माझी आई सांगते मी त्यादिवशी उपाशी राहीले होते! मग मी जेवावं म्हणून माझ्या आईने मला सांगितलं की मी तिच्या पोटात होते! हा फोटो काढत असताना ती चार महीन्याची गरोदर होती. आपण प्रत्यक्षपणे नसलो तरी वेगळ्या जगात अस्तिवात होतो! आयला म्हणजे आपण सुद्धा आहोत की या फोटोत! केवढा तो आनंद! आता हे खरं होतं की खोटं माहीत नाही. पण माझ्या बालबुद्धीला पटेल अशी स्टोरी सांगून माझ्या आईने मी त्यांचीच मुलगी आहे याची खात्री दिली आणि तु पण होतीस या फोटोमध्ये सांगून आपलेपणाची मुळं कायमची घट्ट पेरली! आपल्याला कुणीतरी धरून आहे प्रत्यक्ष अप्रत्क्षपणे ही फिलिंग किती कमाल असते नाई? माझ्यासाठी हाच माझा दो गुब्बारे मोमेंट आहे! तुमच्या आयुष्यात सुद्धा असे अनेक क्षण असतील ना? किंवा एखादा फोटो? कृपया शेअर करा, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले.

Web Title: "Mother assured me that I am his daughter and...", Hemangi Kavi shared an amazing post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.