आईच्या आठवणीत रमले तारे.....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2016 09:37 AM2016-05-07T09:37:49+5:302016-05-07T16:39:15+5:30

           बोटाला धरुन चालवायला शिकविणारी आई.... लहानपणी दोन घास हाताने भरविणारी आई तर मुलाला खरचटले ...

Mother remembered mothers ..... | आईच्या आठवणीत रमले तारे.....

आईच्या आठवणीत रमले तारे.....

googlenewsNext

/>           बोटाला धरुन चालवायला शिकविणारी आई.... लहानपणी दोन घास हाताने भरविणारी आई तर मुलाला खरचटले तरी जिच्या डोळ््यात पाणी येते ती आई. आपली मुले यशाला गवसणी घालावीत म्हणुन दिवसरात्र घरातच काय पण आॅफीसमध्ये देखील कष्ट करणाºया आपल्या आईचे उपकार कोणीच विसरु शकत नाही. मातीच्या गोळ््याला खºया अर्थाने आकार देऊन घडविते ती म्हणजे आपली आई. खरच आई आणि मुलाचे नाते हे खुपच भावनिक अन हळवे असते. अशाच आपल्या आईच्या काही ह्रदयस्पर्षी आठवणींना कलाकारांनी मदर्स डे च्या निमित्ताने सीएनएक्सच्या माध्यामातून उजाळा दिला आहे. मनाच्या कोपºयात बंदिस्त असलेल्या या मेमरीज खास तुमच्यासाठी उलगडल्या आहेत आपल्या या लाडक्या कलाकारांनी. 

                                                   
 
     पुजा सावंत :  मी बारावीला होते त्यावेळी एका सौंदर्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी आई माझ्या मागेच लागली. मला पार्लर मध्ये नेऊन तीने हेअरकट करवून घेतला मेकअप केला अन आम्ही दोघी आॅडिशनसाठी टॅक्सीतून   निघालो  . मी जातानाही तिला नको म्हणत होते. मला नाहीच द्यायच आॅडिशन आधी शिकू दे मग अ‍ॅक्टींगच पाहु असा विचार माझ्या डोक्यात होता. परंतू केवळ आईच्या आग्रहाखातर मी तिथे गेले आॅडिशन दिली अन सिलेक्टही झाले. त्याचवेळी मला माझा पहिला चित्रपट क्षणभर विश्रांती मिळाला. आज मी या क्षेत्रात जर असेल तर ते फक्त अन फक्त माझ्या आईमुळेच.

                                                  

 प्राजक्ता माळी : मी एका फिल्मसाठी काम करीत असताना तिथल्या असीस्टंट डिरेक्टरला माझा आवाज आवडला अन त्यांनी मला एका आॅडिशनला जायला सांगितले. मी त्या आॅडिशनची संपुर्ण तयारी केली अन ज्या दिवशी आम्ही जायला निघणार तेव्हाच माझे आजोबा गेले. मला घरातील सगळ््यांनी सांगितल अशावेळेस तु जाऊ नकोस. वडिलांनी तर नाहीच जायच सांगितल. दहा दिवसांनी जा असे सगळे म्हणायला लागले. परंतू तो दिवस माझ्यासाठी खुपच महत्वाचा होता. कारण ते आॅडिशन काहीही करुन त्याच दिवशी करायच होत, त्यांना इमिजिएट रिप्लेसमेंट हवी होती. मग त्यावेळी माझी आई माझ्या पाठीशी खंबीर उभी राहिली. ती मला घेऊन मुंबईला निघाली. आम्ही दोघीही अशा एकट्या मुंबईला कधीच आलो नव्हतो. आम्ही आॅडिशनला पोहचलो. मी सिलेक्ट देखील झाले अन आश्चर्य म्हणजे अवघ्या पाचव्या दिवशी मी त्या सिरिअलच्या शुटिंगला सुरुवात केली. माझ्या आईने घरच्यांची मने वळविली अन ती सिरिअल माझी फॅमिली नंतर कौतुकाने पाहु लागली. केवळ आईच्या धाडसामुळे अन सपोर्टमुळेच मी इथपर्यंत पोहचले आहे. 

                                                     

 सिद्धार्थ जाधव : आम्ही पुर्वी स्लम एरियामध्ये रहायचो, परंतू माझ्या आईने कधीच माझ्यावर वाईट संस्कार होऊ दिले नाहीत. मला आठवतेय मी एकदा पान खाऊन घरी आलो होतो तेव्हा आईने मला खुप मारले होते. तीने खडसावून सांगितले की असे काही खायचे नाही. ती स्वत: शिकलेली नसली तरी तिने आम्हा सर्व भावंडांना शिक्षित केले आहे. माझा एक भाऊ वकिल आहे, बहिणीचे एम.ए झालेय अन मी कलाकार म्हणुन या क्षेत्रात कार्यरत आहे, या गोष्टीचे श्रेय माझ्या आईलाच जाते. व्यसनापासुन नेहमी लांब रहायचे अशी शिकवण माझ्या आईने सतत दिली. आज मी महाराष्ट्र सरकारच्या व्यसनमुक्ती मोहिमेचा ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसिडर आहे हाच माझ्या आई साठी मोठा सन्मान आहे.

                                                   

 

अनिकेत विश्वासराव : आई सततच आपल्या मुलांसाठी काहीना काही करत असते. माझ्या आईच्या देखील बºयाच अशा आठवणी आहेत ज्या मी सांगु शकतो. आजारपणात आईने घेतलेली काळजी असो किंवा शाळेत असताना तिने माझ्यासाठी केलेली मदत मी कधीच विसरु शकत नाही. मला आठवतेय, मी कदाचित दुसरी किंवा तिसरी इयत्तेतच शिकत असीन. त्यावेळी माझी परिक्षा होती अन आमचा चित्रकलेचा पेपर होता. नेमका मी ड्रॉईंग बॉक्स घरी विसरुन आलो होतो. परिक्षा तर सुरु होणार होती. पण तेवढ्यात माझी आई माझ्यासमोर कलरिंग बॉक्स घेऊन उभी होती. तो क्षण मी कधीच विसरु शकणार नाही. 

                                                             

 सिद्धार्थ चांदेकर : मला क्रिकेट खेळायचे भयंकर वेड होते. मी पुण्यात रहायचो, त्यावेळी मी पाचवी-सहावीत असीन. मला नेहरु स्टेडिअम मध्ये जाऊन क्रिकेट कोचिंग घ्यायचे होते. परंतू तो क्रिकेटचा संपुर्ण स्कीट, युनिफॉर्म, शुज या सर्व गोष्टी घेणे त्यावेळी परवड्याजोगे नव्हते. या सर्व खर्चिक गोष्टींवर पैसे घालविण्याची तेव्हाची परिस्थिती नव्हती. मी खुपच नर्व्हस झालो होतो. मला फार वाईट वाटले होते आता आपल्याला स्टेडिअमवर जाऊन क्रिकेट खेळता येणार नाही यामुळे मी खुप दु:खी झालो होतो. पण माझ्या आईने तिने साठवलेले पैसे नकळतपणे माझ्या कोचिंग फीसाठी भरले. अन क्रिेकेट युनिफॉर्म, शुज ती माझ्यासाठी घेऊन आली. दुसºया दिवशीपासुनच मी स्टेडिअमवर जाऊ लागलो. आईने माझ्यासाठी केलेले हे सॅक्रीफाईज मी कधीच विसरु शकणार नाही.
आईच्या आठवणीत रमले तारे..... 
         

Web Title: Mother remembered mothers .....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.