‘बापजन्म’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 11:44 AM2017-09-12T11:44:41+5:302017-09-12T17:14:41+5:30

निपुण धर्माधिकारी यांच्या बहुप्रतीक्षित ‘बापजन्म’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यावेळी अभिनेते सचिन खेडेकर, पुष्कराज चिरपुटकर, ...

The movie trailer of 'Bapjnam' is displayed | ‘बापजन्म’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘बापजन्म’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

googlenewsNext
पुण धर्माधिकारी यांच्या बहुप्रतीक्षित ‘बापजन्म’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यावेळी अभिनेते सचिन खेडेकर, पुष्कराज चिरपुटकर, शर्वरी लोहोकरे, सत्यजित पटवर्धन आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी उपस्थित होते.

‘बापजन्म’ची प्रस्तुती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटची असून या चित्रपटाची निर्मिती सुमतिलाल शाह आणि सिक्स्टीन बाय सिक्स्टी फोर प्रोडक्शन्सने केली आहे. हा चित्रपट २९ सप्टेंबर २०१७ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.  

यावेळी बोलताना सचिन खेडेकर म्हणाले, “बापजन्म’ हा शब्द मराठीमध्ये प्रचलित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन निपुण करत आहे म्हटल्यावर या चित्रपटाबद्दल साहजिकच उत्सुकता ताणली गेली आहे. या चित्रपटाच्या संहितेबद्दल सर्वोत्तम गोष्ट म्हणजे त्यांत संवेदनशीलता ठासून भरली आहे. मुलगा आणि त्याचे वडील या विषयावर अनेक चित्रपट आत्तापर्यंत आपण पहिले आहेत.  पण निपुणने त्याच्या या चित्रपटात हे नाते अगदी वेगळेपणाने साकारले आहे. जो माणूस संवेदनशील नाही त्याच्या संवेदनांबद्दल काही बोलणे हे कठीण काम असते. आम्ही सर्वांनी हे आव्हान पेलण्याचा प्रयत्न केला आहे. निपुण हा आजच्या पिढीचा लेखक आणि दिग्दर्शक आहे. या चित्रपटात त्याने त्याची सर्जनशीलता खूप चांगल्या पद्धतीने साकारली आहे.”

‘बापजन्म’ची कथा, पटकथा आणि संहिता निपुण धर्माधीकारीनेच लिहीली आहे. तो म्हणतो, “सचिन खेडेकर यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाबरोबर दिग्दर्शक म्हणून माझ्या पहिल्याच चित्रपटात काम करण्याची संधी मिळणे हे मी माझे भाग्य आणि सन्मान मानतो. त्यांचे केवळ सेटवर असणेही आम्हा सर्वांसाठीच अगदी प्रोत्साहनात्मक असे.”

निपुणने याआधी उमेश कुलकर्णी यांच्या ‘हायवे’ या चित्रपटात काम केले असून तो मराठी रंगभूमीवरील व्यावसायिक आणि प्रायोगिक अशा दोन्ही नाटकांमध्ये दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहे. ‘भारतीय डिजिटल पार्टी’साठीच्या ‘कास्टिंग काऊच वूईथ अमेय अँड निपुण’ या वेबशोने त्याला घराघरात पोहोचवले. त्याच्या कामाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखल घेतली गेला असा तो मराठी कलाकार आहे. निपुणचा २०१५मध्ये ‘फोर्ब्स इंडियाज 30 अंडर 30’मधील एक विजेता म्हणून सन्मान झाला.


‘बापजन्म’चे सादरीकरण एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे आहे. या कंपनीने आत्तापर्यंत मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आयचा घो, हापूस, आयडीयाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरेच काही, टाईम प्लीज, मुंबई-पुणे-मुंबई २’ यांसारखे अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. 

Web Title: The movie trailer of 'Bapjnam' is displayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.