पहिल्याच भेटीत पतीने मृणाल दुसानीसला विचारला 'हा' प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 02:15 PM2018-07-10T14:15:25+5:302018-07-10T14:16:30+5:30

मृणाल ही अभिनेत्री असल्याचे नीरजला सांगण्यात आले होते. त्यामुळे या कार्यक्रमाला जाण्याआधी त्याने मृणालचे फोटो इंटरनेटवर पाहिले होते.

Mrunal Dusanis husband asked this question in first meet | पहिल्याच भेटीत पतीने मृणाल दुसानीसला विचारला 'हा' प्रश्न

पहिल्याच भेटीत पतीने मृणाल दुसानीसला विचारला 'हा' प्रश्न

googlenewsNext

'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेतून अभिनेत्री मृणाल दुसानीसने छोट्या पडद्यावर एंट्री मारली. पहिल्याच मालिकेत आपल्या अभिनयाने मृणालने रसिकांची मनं जिंकली. या रोमँटिक मालिकेतील मृणालचा अभिनय रसिकांना विशेषतः तरुणाईला भावला. या मालिकेनं मृणाल हिला दमदार अभिनेत्री अशी ओळख मिळवून दिली. खासकरुन या मालिकेतील मृणालचा साधेपणा रसिकांना भावला. सरळ, साधी आणि सोज्जवळ अभिनेत्री अशी तिची ओळख निर्माण झाली. यानंतर मृणालने 'तू तिथे मी', 'अस्सं सासर सुरेख बाई' या मालिका आणि नाटकांमध्येही काम केलं. या मालिकांमध्येही आपल्या भूमिकेने मृणालने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला. मालिकांमध्ये अत्यंत सरळ साधी आणि सोज्जवळ भूमिका साकारणारी मृणाल रिअल लाइफमध्येही तितकीच साधी आहे. वैयक्तिक आयुष्यातही तिने हा आपला साधेपणा जपला आहे. मात्र या साधेपणामुळे मृणालच्या आयुष्यात एक गंमतीशीर प्रसंग घडला आहे. २ वर्षांपूर्वी मृणाल रेशीमगाठीत अडकली. अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजीनिअर असलेल्या नीरज मोरेसह अरेंज मॅरेज पद्धतीने ती लग्नबंधनात अडकली. लग्नानंतर तिने पतीसह अमेरिकेतच संसार थाटला. कांदेपोहेच्या कार्यक्रमात मृणाल आणि नीरज पहिल्यांदा एकमेकांना भेटले. मृणाल ही अभिनेत्री असल्याचे नीरजला सांगण्यात आले होते. त्यामुळे या कार्यक्रमाला जाण्याआधी त्याने मृणालचे फोटो इंटरनेटवर पाहिले होते. अभिनेत्री असूनही नीरजला मृणालचा मॉर्डन किंवा हॉट अंदाजातील एकही फोटो दिसला नाही. त्यामुळे तू कायमच पंजाबी ड्रेसच घालतेस का असा प्रश्न नीरजने पहिल्याच भेटीत मृणालला विचारला होता. मृणाल केवळ चांगली अभिनेत्रीच नव्हे तर उत्तम डान्सरही आहे. तिने 'एकापेक्षा एक अप्सरा आली' या शोमधून रसिकांची मनं जिंकली आहेत.

सध्या मृणालचा खूप मोठा चाहता वर्ग हा भारतात आहे.त्यामुळे मृणालने असे अचानक मालिका सोडल्यामुळे तिला सोशल मीडियावर अनेकांनी प्रश्न विचारायला सुरूवात केली. गेले काही दिवसांपासून मृणालने एकाही चाहत्यांकडून विचारल्या गेलेल्या प्रश्नांना उत्तर देणे टाळले होते. मात्र आता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मृणालने तिच्या चाहत्यांशी संवाद साधला तेव्हा ती लवकरच भारतात परत येणार असल्याचे तिने गुड न्युज तिच्या चाहत्यांना दिली होती. 

Web Title: Mrunal Dusanis husband asked this question in first meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.