मृणाल कुलकर्णी महानायकाकडून शिकल्या ही गोष्ट…

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 04:46 PM2019-06-17T16:46:20+5:302019-06-17T16:48:14+5:30

शुटिंग आटोपून मृणाल कुलकर्णी या कार्यक्रमासाठी संध्या. ५.४५वा. पोहचल्या. त्यावेळी बिग बी तिथे आधीच पोहोचले होते.

Mrunal kukarni learned this thing from Amitabh Bacchan | मृणाल कुलकर्णी महानायकाकडून शिकल्या ही गोष्ट…

मृणाल कुलकर्णी महानायकाकडून शिकल्या ही गोष्ट…

googlenewsNext

रसिकांच्या लाडक्या अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी. आपल्या अभिनयाने रुपेरी पडदा असो किंवा छोटा पडदा त्यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. चित्रपट आणि मालिकांच्या शुटिंगच्या वेळा पाळणं, वेळेआधी शुटिंगला पोहचणं हे प्रत्येकाला जमतं असं नाही. मात्र अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी ते नियमित पाळलं आहे. जीवनात प्रत्येकजण कुणाकडून ना कुणाकडून काही ना काही शिकतच असतो. याला कलाकार मंडळीही अपवाद नाहीत. मृणाल कुलकर्णी ही बिग बी अमिताभ बच्चन यांच्याकडून एक गोष्ट शिकल्या आहेत. स्वतः त्यांनी याबाबत खुलासा केला आहे. 


बिग बी यांच्याप्रमाणेच शुटिंग आणि कार्यक्रमस्थळी त्या वेळेआधी पोहचतात. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्यासाठी मृणाल कुलकर्णी गेल्या होत्या. त्या कार्यक्रमाला बिग बी प्रमुख पाहुणे होते.शुटिंग आटोपून मृणाल कुलकर्णी या कार्यक्रमासाठी संध्या. ५.४५वा. पोहचल्या. त्यावेळी बिग बी तिथे आधीच पोहोचले होते. उपस्थितांशी ते गप्पा मारत होते. त्यांना पाहून मृणाल कुलकर्णी आश्चर्यचकित झाल्या. कारण आयोजकांनी बिग बींना संध्या.६वा.ची वेळ दिली होती. मात्र बिग बी वेळेच्या अर्धा तासआधीच म्हणजे ५.३०वा. कार्यक्रमस्थळी पोहोचले होते. इतका मोठा कलाकार वेळ पाळत असल्याचे पाहून मृणाल कुलकर्णी थक्क झाल्या आणि हीच गोष्ट त्या स्वतःही नियमित पाळतात. 
 

Web Title: Mrunal kukarni learned this thing from Amitabh Bacchan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.