मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडेचा अभिनयाव्यतिरिक्त करतात हा व्यवसाय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 07:00 AM2022-09-28T07:00:00+5:302022-09-28T07:00:00+5:30
मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध बहिणी देशपांडे सिस्टर्स म्हणजेच मृण्मयी आणि गौतमी. या दोघी बऱ्याचदा चर्चेत येत असतात.
मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध बहिणीपैकी एक देशपांडे सिस्टर्स म्हणजे मृण्मयी आणि गौतमी(Mrunmayee Deshpande And Gautami Deshpande). या दोघी बऱ्याचदा चर्चेत येत असतात तेही सोशल मीडियावरील मजेशीर व्हिडीओंमुळे. मात्र आता अभिनेत्रींसोबतच या दोघीही आता उद्योजिका म्हणजेच Business Women झाल्यात. होय नुकताच मृण्मयी आणि गौतमीने बिझनेस सुरू केला आगे. निल अॅण्ड मोमो असं त्यांच्या ब्रॅण्डचं नाव आहे. यामध्ये हॅण्डमेड साबण गौतमी आणि मृण्मयी बनवून विकत आहेत.
निल अॅण्ड मोमो या हॅण्डमेड साबणाचा व्यवसाय गौतमी, मृण्मयी आणि मृण्मयीचा पती स्वप्निल राव यांनी मिळून सुरू केला आहे आणि याबाबतची माहिती मृण्मयी आणि गौतमीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत दिली आहे. त्यांच्या या नव्या बिझनेससाठी मराठी सिनेसृष्टीत अनेकांकडून तसेच त्यांच्या चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
काही दिवसांपूर्वी मृण्मयी आणि गौतमीने त्या काहीतरी नवीन घेऊन येणार असल्याचे सांगितले होते. त्याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्येही त्यांचं भांडणही झालं होतं.
मृण्मयी आणि गौतमी यांचं नातं खूप खास आहे. या दोघी बहिणी एकमेकांची फजिती करायची एकही संधी सोडत नाहीत. सध्या त्यांनी एक नवा कार्यक्रम सुरु केला आहे ज्यात मोठी बहीण वर्सर्स लहान बहीण असे एकमेकांबद्दलच्या गोड तक्रारी त्या रील्सच्या माध्यमातून मांडत असतात. त्यांच्या या रील्सना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यात मृण्मयी गौतमीचे किस्से सांगून तिला तोंडावर पाडते तर गौतमी सुद्धा मागे न हटता मृण्मयीची फजिती करते.