मृण्मयी - राहुल पुन्हा एकत्र, चित्रपटाची होणार घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 08:00 AM2019-04-12T08:00:00+5:302019-04-12T08:00:00+5:30

मृण्मयी - राहुल '१५ ऑगस्ट' या चित्रपटाच्या यशानंतर ही जोडी पुन्हा एकदा एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Mrunmayee Deshpande And Rahul Working Together For New Marathi Movie | मृण्मयी - राहुल पुन्हा एकत्र, चित्रपटाची होणार घोषणा

मृण्मयी - राहुल पुन्हा एकत्र, चित्रपटाची होणार घोषणा

googlenewsNext

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या '१५ ऑगस्ट' या मराठी चित्रपटात झळकलेली फ्रेश जोडी म्हणजे मृण्मयी देशपांडे आणि राहुल पेठे.  वेब सिरीजमधील दोघांच्या भूमिकेचे आणि याची जोडी रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती.  '१५ ऑगस्ट' या चित्रपटाच्या यशानंतर ही जोडी पुन्हा एकदा एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप समजू शकले नसले तरी या चित्रपटात मृण्मयी एका 'ट्रॅव्हलर'च्या भूमिकेत दिसणार असल्याचे समजतेय. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन मृण्मयीनेच केले आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर मृण्मयीचा नवा 'लूक' व्हायरल होत होता. हा तिचा लूक कशासाठी याची सर्वत्र चर्चा सुरु असतानाच तिचा हा लूक या चित्रपटासाठी असल्याचे उघडकीस आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचे वेगवेगळे प्रमोशन फंडे वापर पब्लिसिटी केली जात आहे. अनोख्या पब्लिसिटी स्टंटमुळे या चित्रपटाने सा-यांचे लक्ष वेधले आहे. मृण्मयी आणि राहुलला दुसऱ्यांदा एकत्र पाहायला मिळणार असल्याने त्यांच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. राहुलची चित्रपटातील भूमिका अजूनतरी गुलदस्त्यात आहे.

राहुलने याआधी अनेक हिंदी, मराठी मालिकांमधून काम केले आहे. शिवाय 'मिस्टर अँड मिसेस सदाचारी', 'व्हेंटिलेटर', 'वक्रतुंड महाकाय' 'मुंबई मेरी जान' अशा अनेक गाजलेल्या मराठी, हिंदी चित्रपटांमध्येही त्याने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय त्याने वेबसिरीजमध्येही आपले अभिनयकौशल्य दाखवले आहे. त्यामुळे आता या चित्रपटात राहुलची काय भूमिका आहे, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Web Title: Mrunmayee Deshpande And Rahul Working Together For New Marathi Movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.