मृण्मयी देशपांडेनं नवऱ्यासाठी लिहिली खास पोस्ट, 'असं' जमलं होतं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 01:20 PM2024-12-03T13:20:18+5:302024-12-03T13:20:34+5:30
मृण्मयीच्या लग्नाला ८ वर्ष पुर्ण झाली आहेत.
Mrunmayee Deshpande-Swapnil Rao : अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (mrunmayee deshpande) सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत येत आहे. आज तिने एक पोस्ट शेअर केली आहे, ही पोस्ट खूप चर्चेत आली आहे. त्याला कारणही तसे खास आहे. आज मृण्मयीच्या लग्नाला ८ वर्ष पुर्ण झाली आहेत. या खास दिवशी तिने नवऱ्यासोबतचा एक रोमँटिक व्हिडीओ शेअर केला आहे.
मृण्मयी हिने सुंदर फोटोंनी बनवलेला व्हिडीओ पोस्ट करत तिचा नवरा स्वप्नील रावला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मृण्मयीनं लिहलं, "8 वर्ष... स्वप्नील गेली 9 वर्षे आपण एकमेकांना ओळखतो...त्यात सहजीवनाची ही 8 वर्षे. या संपूर्ण काळात आपल्या नात्यात कधीच कंटाळवाणा असा एकही क्षण आला नाही. ही सगळी वर्षे अत्यंत सुंदर होती. माझं तुझ्यावर खूप प्रेम आणि त्यापेक्षाही मला तुझा प्रचंड अभिमान आहे. आपण निवडलेला मार्ग निश्चितच सोपा नाहीये. पण, हे क्षण मी तुझ्याशिवाय अन्य कोणाबरोबरही अनुभवू शकत नाही. आयुष्यात असेच सुंदर क्षण एकत्र घालवूयात. आय लव्ह यू". या पोस्टवर अनेक कलाकारांनी तसंच चाहत्यांनीही शुभेच्छांचा वर्षाव केलाय.
मृण्मयी आणि तिचा नवरा स्वप्नील राव हे मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रेमळ जोडप्यांपैकी एक आहेत. तिचा नवरा एक उद्योगपती आहे. या दोघांनी ३ डिसेंबर २०१६ रोजी लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाची तेव्हा जोरदार चर्चा झाली होती. पारंपारिक मराठमोळ्या पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. परंतु, तुम्हाला माहितीये का मृण्मयीचं लग्न अरेंज मॅरेज पद्धतीने जमलं होतं. सध्या मृण्मयी मुंबईतलं धकाधकीचं जगणं सोडून नवऱ्यासोबत महाबळेश्वरला शिफ्ट झाली आहे. तिथे ते दोघं शेतीही करतात. मृण्मयी कायम पतीसोबतचे रोमाँटिक फोटो शेअर करत असते. फोटोंमधून दोघांमधले बॉन्डिंग नेहमी दिसते.