लग्नाला ३ महिने होताच गोव्याला गेले मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे, शेअर केले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 16:27 IST2024-03-23T16:26:43+5:302024-03-23T16:27:32+5:30
मराठी संगीत विश्वातली गाजलेली जोडी म्हणजे प्रथमेश लघाटे (prathamesh laghate ) आणि मुग्धा वैशंपायन (mugdha vaishampayan). लग्न झाल्यापासून ही जोडी कायम चर्चेत असतात

लग्नाला ३ महिने होताच गोव्याला गेले मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे, शेअर केले फोटो
मराठी संगीत विश्वातली गाजलेली जोडी म्हणजे प्रथमेश लघाटे (prathamesh laghate ) आणि मुग्धा वैशंपायन (mugdha vaishampayan). लग्न झाल्यापासून ही जोडी कायम चर्चेत असतात. ते दोघे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असतात. दरम्यान आता त्यांच्या लग्नाला ३ महिने पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने ते दोघे गोव्यातील देवस्थानाला भेट देऊन आशीर्वाद घेत आहेत.
मुग्धा वैशंंपायनने प्रथमेशसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, कालच आमच्या लग्नाला ३ महिने पूर्ण झाले! याच निमित्ताने आज गोव्यातल्या केरीला जाऊन विजयादुर्गा देवीचं आणि माणगावातील श्री दत्त मंदिरात जाऊन दत्त महराजांचं, श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महराजांचं दर्शन घेतलं! हेची घडो मज जन्मजन्मांतरी मागणे श्रीहरी नाही दुजे |
मुग्धाच्या या पोस्टवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. एका युजरने लिहिले की, गोड दिसताय दोघे. दुसऱ्या युजरने म्हटले की, असेच आनंदी आनंदी राहा. देव तुम्हा दोघांचे कल्याण करो. आणखी एका युजरने लिहिले की, नांदा सौख्य भरे. या फोटोत मुग्धाच्या केसातील सुरंगीच्या गजऱ्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
दरम्यान, मुग्धा आणि प्रथमेश ही जोडी ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून लोकप्रिय झाली. विशेष म्हणजे हे दोघेही मराठी कलाविश्वात सक्रीय आहे. तसंच मुग्धाचं युट्यूब चॅनेल सुद्धा आहे जेथे ती प्रथमेशसोबतच्या गाण्याचे व्हिडीओ शेअर करत असते.