'पोरीने विषय हार्ड...', पर्ण पेठेचा सिनेमा पाहून मुक्ता बर्वेची प्रतिक्रिया; शेअर केली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 11:14 AM2024-07-08T11:14:41+5:302024-07-08T11:15:25+5:30

मुक्ता बर्वे आणि पर्ण पेठेची गळाभेट

Mukta Barve shared post for Parna Pethe after watching her movie Vishay Hard | 'पोरीने विषय हार्ड...', पर्ण पेठेचा सिनेमा पाहून मुक्ता बर्वेची प्रतिक्रिया; शेअर केली खास पोस्ट

'पोरीने विषय हार्ड...', पर्ण पेठेचा सिनेमा पाहून मुक्ता बर्वेची प्रतिक्रिया; शेअर केली खास पोस्ट

मराठमोळी अभिनेत्री पर्ण पेठे (Parna Pethe) तिच्या क्युटनेसमुळे नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. पर्णचा 'विषय हार्ड' हा मराठी सिनेमा नुकताच रिलीज झाला. यातील पर्णच्या भूमिकेचंही कौतुक होतंय. पर्णची यात मुख्य भूमिका असून ही रोमँटिक लव्ह स्टोरी आहे. मराठीतील अनेक सेलिब्रिटींनी 'विषय हार्ड'च्या स्क्रीनिंगला हजेरी लावली. अभिनेत्री मुक्ता बर्वेही (Mukta Barve) स्क्रीनिंगला आली होती. पर्णसाठी तिने खास पोस्ट शेअर केली.

मुक्ता बर्वे आणि पर्ण पेठे एकमेकींच्या खास मैत्रिणी आहेत. दोघी 'चारचौघी' या नाटकात काम करतात. मैत्रिणीच्या सिनेमाला मुक्ताने हजेरी लावली तेव्हा दोघींनी गळाभेट घेतली. त्यांचा हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. मुक्ताने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले, 'आमच्या पोरीनी विषय हार्ड करुन टाकलाय. एक साधी, सोप्पी, भरपूर हसवणारी फिल्म बनवल्याबद्दल सर्व तंत्रज्ञ आणि कलाकारांचं मनापासून अभिनंदन. सगळ्यांनी छान कामं केली आहेत. संगीतही आवडलं."

पर्ण पेठेने याआधी अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'रमा माधव','मीडियम स्पायसी','फोटोकॉपी','अश्लील उद्योग मित्रमंडळ','वायझेड','फास्टर फेणे','विहीर' या सिनेमांचा समावेश आहे. पर्ण पेठेने 2016 साली अभिनेता अलोक राजवाडेसोबत लग्न केले. एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान त्यांची ओळख झाली होती. दोघांनी कलाक्षेत्रात नाव कमावलं आहे.

 

Web Title: Mukta Barve shared post for Parna Pethe after watching her movie Vishay Hard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.