मुक्ता बर्वेची आईच्या वाढदिवशी सोशल मीडियावर खास पोस्ट; म्हणाली, "हातातला स्पायडरमॅन..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 15:27 IST2024-08-14T15:26:52+5:302024-08-14T15:27:36+5:30
मुक्ता बर्वेची आई विजया या शिक्षिका आणि नाट्यलेखिकाही आहेत.

मुक्ता बर्वेची आईच्या वाढदिवशी सोशल मीडियावर खास पोस्ट; म्हणाली, "हातातला स्पायडरमॅन..."
मुक्ता बर्वे (Mukta Barve) मराठीतील अतिशय प्रतिभावान अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयाची बातच वेगळी आहे. अभिनयाबाबतीत ती अत्यंत चोखंदळ आहे. आज मुक्ता बर्वेची आई विजय बर्वे यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त मुक्ताने आईचा एक खास फोटो शेअर करत छान कॅप्शन दिलं आहे. या फोटोत तिच्या आईच्या हातात स्पायडरमॅनचं खेळणं दिसतंय. यामागचं कारणही तिने लिहिलं आहे.
मुक्ता बर्वेची आई विजया या शिक्षिका आणि नाट्यलेखिकाही आहेत. मुक्ताने चार वर्षींची असताना पहिल्यांदा 'रुसू नका फुगू नका' या बालनाट्यात काम केलं होतं. याचं लेखन विजया बर्वे यांनीच केलं होतं. आज आईच्या वाढदिवसानिमित्त मुक्ताने खास फोटो शेअर करत लिहिले, "Happy birthday My crochet master. आऊ तुझं perfection, करत असलेल्या प्रत्येक कामाबद्दलची आत्मियता, जिद्द, तन्मयता, नविन गोष्ट शिकण्यातला उत्साह, विविध जागा बघण्याची-भटकंतिची ओढ सगळंच भन्नाट. ( यातलं काही अंशी जरी माझ्यात आलं तरी मी भरून पावेन).
आऊ तुला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी, आवडती फुलं तुला भरभरून मिळोत. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा( आई च्या हातातला स्पायडरमॅन , खूप प्रयत्नांनी आई नी स्वतः विणला आहे, कष्ट तिचे आणि कॅालर माझी ताठ )"
मुक्ता बर्वेचे नुकतेच 'अलिबाबा आणि चाळीशीतले चोर', 'नाच गं घुमा' या एकामागोमाग आलेल्या सिनेमांमध्ये दिसली. दोन्ही चित्रपटातील तिची भूमिका चांगलीच गाजली.