शेती करणार म्हणून अनेकांनी तिला वेड्यात काढलं, आज 18 कोटींची कंपनी चालवते ही अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 08:00 AM2022-03-07T08:00:00+5:302022-03-07T08:00:02+5:30

Mulshi Pattern : ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात चहाची टपरी चालवणारी अभिनेत्री आठवत असेलच. पण ती केवळ अभिनेत्री नाही तर शेतीत रमणारी मुलगीही आहे. होय, आज ती शेकडो शेतकऱ्यांना मदत करतेय. 18 कोटींची कंपनी चालवतेय.

Mulshi Pattern fame actress Malvika Gaekwad have taken up farming | शेती करणार म्हणून अनेकांनी तिला वेड्यात काढलं, आज 18 कोटींची कंपनी चालवते ही अभिनेत्री

शेती करणार म्हणून अनेकांनी तिला वेड्यात काढलं, आज 18 कोटींची कंपनी चालवते ही अभिनेत्री

googlenewsNext

मुळशी पॅटर्न’ (Mulshi Pattern) या चित्रपटात चहाची टपरी चालवणारी अभिनेत्री आठवत असेलच. तिचं नाव मालविका गायकवाड (Malvika Gaekwad). पण मालविका केवळ अभिनेत्री नाही तर शेतीत रमणारी मुलगीही आहे. होय, ग्लॅमर, पैसा यापेक्षा समाधान महत्त्वाचं असतं आणि ते समाधान तिला मिळालं ते शेतीतून. होय, आज ती शेकडो शेतकऱ्यांना मदत करतेय. 18 कोटींची कंपनी चालवतेय.

मालविका ही मुळात आयटी इंजिनिअर. इंजिनिअर झाल्यावर पुण्यातील एका नामांकित कंपनीत तिला गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळाली. काही दिवस आयटी सेक्टरमधील ग्लॅमर, पैसा तिला बरा वाटला. पण हळूहळू तिची घुसमट सुरू झाली. समाधान कुठे मिळेना. अशात तिला शेती खुणावू लागली. मालविकाने पगाराच्या पैशातून शिरूर येथे दीड एकर शेती घेतली आणि या शेतीवर सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय तिने घेतला.

शेती करण्याच्या निर्णयामुळे तिच्या नातेवाईकांनी, मित्रांनी तिला वेड्यात काढलं. पण मालविका तिच्या निर्णयावर ठाम होती. पुढे तिच्याच विचाराचे दोन मित्र मिळाले आणि मालविका सेंद्रिय शेतीत रमली. इतकी की, त्यासाठी तिने गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीलाही लाथ मारली.
तिले स्वत:ची ‘द ऑरगॅनिक कार्बन’ नावाची कंपनी देखील सुरू केली. शेतकऱ्यांना देखील याचा थेट फायदा   झाला. पुढचं प्लॅनिंग अर्थात ठरलेलं होतं. दोन मित्रांना सोबत घेऊन ती दुग्ध व्यवसायातही उतरली. विशाल चौधरी,   जयवंत पाटील आणि मालविका अशा तिघांनी ‘हंपी ए 2’ नावाची  कंपनी सुरू केली.  दूध, तूप, दही,पनीर साच सोबत मिल्क ऑइल, कोकोनट ऑइल यासारखे अनेक पदार्थ त्यांच्या कंपनीत बनू लागले. आता ही कंपनी  तब्बल 18 कोटींच्या घरात गेली आहे. वर्षाला जवळपास 4 कोटींचा नफा ते यातून कमावताना पाहायला मिळतात.


 
असा मिळाला होता मुळशी पॅटर्न हा सिनेमा

एकदा जिममध्ये वर्क आऊट करताना प्रवीण तरडे यांच्या एका मित्राने तिला चित्रपटात काम करणार का? असं विचारलं. त्यावर तिने हसून मला त्यातलं काही माहित नाही पण चित्रपट काम करायला आवडेल असं म्हटलं. मग काय मित्राने प्रवीण तरडे यांची भेट घालून दिली आणि मुळशी पॅटर्न मध्ये झळकायची संधी तिला मिळाली. पण आपल्याला शेती करण्यातच विशेष रस आहे असं ती नेहमी म्हणायची आणि तिने ते करून दाखवलं.  मालविका ही बडोद्याच्या गायकवाड घराण्याची राजकन्या आहे. 2020 साली मालविका ही सिद्धार्थ सिंघवीसोबत लग्नाच्या बंधनात अडकली.  

Web Title: Mulshi Pattern fame actress Malvika Gaekwad have taken up farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.