‘मुंबई पुणे मुंबई-३’ सिनेमा ३ दिवसात केला इतक्या कोटींचा गल्ला, वाचून तुम्हाला ही बसले धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 06:14 PM2018-12-10T18:14:23+5:302018-12-10T18:18:50+5:30

‘मुंबई पुणे मुंबई-३’ हा मराठी चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला असून तो महाराष्टात धुमधडाक्यात सुरु आहे. या चित्रपटाने तीन दिवसांत ५ कोटींचा गल्ला जमवला आहे.

Mumbai pune mumbai 3 movie collection is this much crores in just 3days | ‘मुंबई पुणे मुंबई-३’ सिनेमा ३ दिवसात केला इतक्या कोटींचा गल्ला, वाचून तुम्हाला ही बसले धक्का

‘मुंबई पुणे मुंबई-३’ सिनेमा ३ दिवसात केला इतक्या कोटींचा गल्ला, वाचून तुम्हाला ही बसले धक्का

googlenewsNext
ठळक मुद्दे‘मुंबई पुणे मुंबई’च्या या तिसऱ्या भागालासुद्धा सिनेरसिकांनी डोक्यावर घेतले आहे‘मुंबई पुणे मुंबई-३’ची कथा पल्लवी राजवाडे यांनी लिहिली आहे

‘मुंबई पुणे मुंबई-३’ हा मराठी चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला असून तो महाराष्टात धुमधडाक्यात सुरु आहे. या चित्रपटाने तीन दिवसांत ५ कोटींचा गल्ला जमवला आहे. ‘मुंबई पुणे मुंबई’च्या या तिसऱ्या भागालासुद्धा सिनेरसिकांनी डोक्यावर घेतले आहे. दिग्दर्शक सतीश राजवाडेंच्या या चित्रपटात स्वप्नील-मुक्ताने साकारलेल्या गौतम-गौरी यांच्या आयुष्यात पुढे काय घडते, हे पाहण्यासाठी सिनेरसिक गर्दी करत आहेत. दमदार कथानक, कलाकारांचा कसदार अभिनय, उच्च निर्मितीमूल्ये यामुळे ‘मुंबई पुणे मुंबई-३’ चित्रपटाने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. 

 
दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणाले की, ‘सिनेरसिकांचे मी प्रथम आभार मानतो, त्यांच्या प्रतिसादामुळे आणि प्रेमामुळे आम्ही इथपर्यंत मजल मारली आहे’. ते पुढे म्हणाले की ‘आशय चांगला असेल तर मराठी प्रेक्षक चित्रपट उचलून धरतो. हिंदी चित्रपटांपेक्षा आज आपण सरस ठरलो आहोत, याचे कारण हेच आहे. या यशाच्या आधारावर आपण पुढील वर्ष सुरक्षित करायला हवे. त्यासाठी सर्व निर्मात्यांनी एकत्र आले पाहिजे. चित्रपटांच्या तारखा एकत्र होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे’.

 तिसऱ्या भागाची निर्मिती करणारा ‘मुंबई पुणे मुंबई’ ३ हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. मराठीतील आघाडीची जोडी स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे सलग तिसऱ्यांदा दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्याबरोबर एकत्र आले आहेत. चित्रपटाशी घट्ट जोडल्या गेलेल्या या नावांसह ‘मुंबई पुणे मुंबई ३’मध्ये आणखीही दिग्गज कलाकार जोडले गेले आहेत. रोहिणी हट्टंगडी, प्रशांत दामले, सविता प्रभुणे, सुहास जोशी, मंगल केंकरे आणि विजय केंकरे यांच्याही यात महत्वाच्या भूमिका आहेत. ‘मुंबई पुणे मुंबई-३ चित्रपटाची निर्मिती ‘एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट’च्या संजय छाब्रिया यांनी केली असून चित्रपटाचे सहनिर्माते ‘52 फ्रायडे सिनेमाज’चे अमित भानुशाली आहेत. ‘मुंबई पुणे मुंबई-३’ची कथा पल्लवी राजवाडे यांनी लिहिली आहे. चित्रपटाची पटकथा आणि संवाद अश्विनी शेंडे आणि पल्लवी राजवाडे यांची आहे.

Web Title: Mumbai pune mumbai 3 movie collection is this much crores in just 3days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.