म्युजिक अरेंजर प्रफुल्ल कार्लेकरने मराठी सिनेसृष्टीबाबत हे रहस्य केले उघड?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2017 10:22 AM2017-02-03T10:22:29+5:302017-02-04T13:20:32+5:30

'काटे','राजू चाचा', कभी ख़ुशी कभी गम' तसेच 'यादें' यांसारख्या बॉलीवूडच्या नावाजलेल्या सिनेमासाठी ऑडियो रेकॉर्डिस्ट म्हणून काम करणारा हा  प्रफुल्ल ...

Music Aranger Praful Karlekar has made this mystery about Marathi culture? | म्युजिक अरेंजर प्रफुल्ल कार्लेकरने मराठी सिनेसृष्टीबाबत हे रहस्य केले उघड?

म्युजिक अरेंजर प्रफुल्ल कार्लेकरने मराठी सिनेसृष्टीबाबत हे रहस्य केले उघड?

googlenewsNext
'
;काटे','राजू चाचा', कभी ख़ुशी कभी गम' तसेच 'यादें' यांसारख्या बॉलीवूडच्या नावाजलेल्या सिनेमासाठी ऑडियो रेकॉर्डिस्ट म्हणून काम करणारा हा  प्रफुल्ल कार्लेकर हा कलाकार नेहमीच पडद्यामागे  काम करणारा या कलाकाराला आपल्या कौशल्याने समोर आला.या संगीतकार प्रफुल्ल कार्लेकर म्हटले की म्युझिकच्या दुनियेत रमलेला या अवलियाने स्वतःच्या मेहनतीने  सिनेसृष्टीत आपली स्थान निर्माण केले आहे.मराठीसह म्युझिक अरेंजर म्हणून आपल्या म्युझिकल करिअरची सुरुवात करणाऱ्या प्रफुल्लने हिंदीतही चांगलाच जम बसवला आहे. 

करिअरच्या सुरुवातीलाच प्रफुल्लला नाना पाटेकर, अक्षय कुमार आणि अनिल कपूर यांच्या गाजलेल्या 'वेलकम' या बॉलिवूड सिनेमातील 'तेरा सराफा', 'होंठ रसीले' या दोन गाण्यांसाठी म्युजिक अरेंजर आणि प्रोग्रामर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. संगीतवेड्या प्रफुल्लने देखील या संधीचे सोने करत स्वतःला सिद्ध केले. त्यानंतर धुनकी' (मेरे ब्रदर की दुल्हन), 'सैयां' (गुंडे), 'जिया मेरा जिया' (गुंडे), 'आशिक तेरा' (हॅप्पी भाग जायेगी') अशा अनेक हिंदी गाण्यांसाठी त्याने काम केले. त्याच्या या यशस्वी घोडदौडीमध्ये 'ये जवानी है दिवानी' या सिनेमामधील माधुरीवर चित्रीत झालेले 'घागरा' गाण्याचा  देखील यात समावेश होतो. अशाप्रकारे हिंदीतील दर्जेदार गाण्यांमध्ये महत्वाचा वाटा उचलणाऱ्या प्रफुल्लने मराठीतदेखील संजय जाधव दिग्दर्शित 'दुनियादारी' हा सुपरहिट सिनेमा प्रफुल्लच्या कारकिर्दीतला माईल स्टोन ठरला. 

दिग्दर्शक असो किंव मग कलाकारा यांचे काम रसिकापर्यंत लवकर पोहचत असल्यामुळे त्यांची एक ओळख निर्माण होते.मात्र जे पडद्यामागे राहुन काम करतात त्यांचे कौशल्य कधीच रसिकांसमोर येत नाही.त्यासाठी फारसे प्रयत्नही कधी होताना दिसत नाही. त्यामुळे पडद्यामागे राहून आपले काम रसिकांपर्यंत पोहचवलेला प्रफुल्ल याविषयी सांगतो.मी माझ्या नावाने नाही तर,कामाने लोकांपर्यत पोहोचतो. जेव्हा लोकांना गाणी आवडतात तेव्हा त्याची पोचपावती मला आपसूकच मिळते. अशा लाइमलाईटपासून दूर असलेल्या अनेक कलावंतांना प्रकाशझोतात आणण्याची गरज आहे. कारण आजच्या आधुनिक युगात शेक्सपियरच्या नावात काय आहे? ... या प्रश्नाला 'नावातच भरपूर काही आहे' हे प्रतिउत्तर सार्थकी ठरत आहे. 

या सिनेमातलं आदर्श शिंदे याच्या आवाजातले 'देवा तुझ्या गाभाऱ्याला' हे मंदार चोळकर लिखित तसेच अमितराज दिग्दर्शित या गाण्यापासून मराठी सिनेसृष्टीत प्रफुल्लने आपले पहिले पाऊल टाकले. यातही प्रफुल्लने हिंदीसारखी कामगिरी करत आपल्या करिअरचा ग्राफ उंचावत नेला.  'आवाज वाढव डीजे' (पोश्टर गर्ल), 'गुलाबाची कळी' (तू ही रे), 'मोरया' (दगडी चाळ), या गाण्यांसाठी त्याने म्युझिक अरेंजर म्हणून काम केले आहे, तसेच 'गुरु' या अंकुश चौधरीच्या गाजलेल्या सिनेमातील 'आत्ता लढायचे' या गाण्याचे दिग्दर्शन देखील प्रफुल्लने केले आहे. संगीतजगतातली त्याची ही मजल आजही तशीच कायम आहे. स्वतंत्र संगीत दिग्दर्शक म्हणून प्रफुल्लने "वाजलाचं पाहिजे" आणि "तालीम" या सिनेमांना संगीत दिलं आहे, त्याचप्रमाणे नेहा राजपाल यांच्या फोटोकॉपी सिनेमातल्या "मोरा पिया" या गाण्यालासुद्धा प्रफुल्लचे संगीत लाभले आहे. सिनेमातल्या गाण्यांविषयी बोलायचं झालं तर अनेक नावाजलेल्या गाण्यांना रसिक त्याच्या नावाने ओळखतात. मात्र हे गाणं घडवण्यामागे जितकी मेहनत गीतकाराची- गायकाची असते, तितकीच मेहनत त्या गाण्याला दिशा देणा-या ऑडिओ आणि  म्युझिक अरेंजरचीदेखील असते. त्यामुळे कोणत्याही गाण्याचे श्रेय हे एकट्या गायकाचे किवा गीत-लेखकाचे नसून ते सादरीकरण करण्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आहे! प्रफुल्ल लवकरच विक्रम फडणीस यांच्या आगामी 'हृदयांतर' या सिनेमाच्या माध्यमातून स्वतंत्र संगीत दिग्दर्शन करणार आहे.

Web Title: Music Aranger Praful Karlekar has made this mystery about Marathi culture?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.