संगीत मार्तंडांची सजली मैफील

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2016 04:00 PM2016-12-09T16:00:03+5:302016-12-09T16:00:03+5:30

शीतल गारवा...अन सप्तसूरांचे चांदणे...अशा मनमोहक आसमंतात मेवाती घराण्याचे ज्येष्ठ गायक संगीतमार्तंड पं. जसराज यांची अविस्मरणीयमैफिल सजली. दोन वर्षांपासून रसिकांशी ...

Music Music | संगीत मार्तंडांची सजली मैफील

संगीत मार्तंडांची सजली मैफील

googlenewsNext
तल गारवा...अन सप्तसूरांचे चांदणे...अशा मनमोहक आसमंतात मेवाती
घराण्याचे ज्येष्ठ गायक संगीतमार्तंड पं. जसराज यांची अविस्मरणीयमैफिल
सजली. दोन वर्षांपासून रसिकांशी सांगीतिक दुरावा निर्माण झालेल्या
त्यांच्या  स्वरांनी कळससाध्य गाठत एका परमोच्च आनंदाची अनुभूती रसिकांना
दिली..ओम नमो वासुदेवाय भगवते’ या भजनातून  मैफिलीला अनोखा स्वरसाज चढला
आणि रसिकांना ब्रम्हानंदी टाळी लागली.
महोत्सवाच्या उत्तरार्धात रंग भरले ते पंडित जसराजांच्या स्वराभिषेकाने.
आवाजातील चढउतार, स्वरांवरची जबरदस्त हुकूमत, उत्तम आलापी अशा
वैशिष्टयातून सादर झालेल्या  त्यांच्या गायनाने महोत्सवाला एक वेगळीच
उंची प्राप्त झाली. महोत्सवात दोन वर्षांपासून त्यांचे म्हणावे तसे
आनंदानुभूती देणारे गायन झाले नव्हते, स्वरमंचावर उपस्थित असूनही
शिष्यांच्या सादरीकरणातून त्यांची मैफिल रंगत होती, परंतु त्यांचा आवाज
ऐकण्यासाठी कानसेन आतूर झाले होते, यंदा तो मणिकांचन योग जुळून आला. ’जय
हो’ चे सूर आसमंतात गुंजले आणि रसिकांच्या हदयाचा ठोका चुकला. जोग रागाने
मैफिलीस प्रारंभ करीत घट अंगना, राम को राम बनाया तुने या बंदिशी त्यांनी
खुलविल्या.  ओम नमो भगवते वासुदेवाय या भजनाने त्यांनी मैफिलीची सांगता
केली.त्यांना हार्मोनिअमवर मुकुंद पेटकर, तबल्यावर केदार पंडित,
मृदुंगावर श्रीधर पार्थसारथी, तानपु-यावर रतनमोहन शर्मा, अंकिता जोशी,
सुरेश पत्की, सिमांतिनी ठकार आणि संदीप रानडे यांनी साथसंगत केली.
पंडित जसराज यांच्या सादरीकरणापूर्वी मंजिरी असनारे-केळकर यांचे बहारदार
गायन झाले.  झिंझोटी रागाचे सौंदर्य उलगडत तीन बंदीशी त्यांनी खुलविल्या.
शिवशांकाराची आराधना करणा-या महादेव विश्वंभर  जयजुट, हे शिव शंकर आणि हर
हर शंकर या रचना सादर करून त्यांनी रसिकांना जिंकले. उत्तम सादरीकरणातून
स्वरांचे एकेक पदर उलगडत त्यांनी आसमंतात चैतन्य निर्माण केले, त्यानंतर
परज रागातील अखिया मोरी लागन ही विलंबित एकतालातील बंदिश त्यांनी सादर
केली.  या पंढरीचे सुख पाहाता या अभंगाने त्यांनी भक्तीमय वातावरणाची
निर्मिती करीत मैफिलीचा शेवट केला.  त्यांना माऊली टाकळ कर यांनी टाळेवर,
सुयोग कुंडलकर यांनी हार्मोनिअँवर, उत्पल दत्त यांनी तबल्यावर तर देवकी
नवधारे आणि अमृता मोगल यांनी तानापुर्यावर साथसंगत केली.

Web Title: Music Music

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.