संगीतकार कौशल इनामदार यांच्या वडिलांचे निधन, ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 01:54 PM2024-07-20T13:54:44+5:302024-07-20T13:55:06+5:30

अनेक मराठी सिनेमांना श्रवणीय संगीत देणारे संगीतकार कौशल इनामदार यांना पितृशोक

Musician Kaushal Inamdar's father passes away at the age 79 | संगीतकार कौशल इनामदार यांच्या वडिलांचे निधन, ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

संगीतकार कौशल इनामदार यांच्या वडिलांचे निधन, ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

'बालगंधर्व', 'नॉट ऑन्ली मिसेस राऊत', 'अजिंठा', 'फोटोप्रेम' अशा लोकप्रिय मराठी सिनेमांच्या संगीताची धुरा सांभाळणारे संगीतकार-गायक कौशल इनामदार यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. कौशल यांचे वडील एस.एन.इनामदार यांचे ७९ वर्षी निधन झाले आहे. वरिष्ठ कर सल्लागार आणि मुंबई उच्च न्यायालयातील नियुक्त वरिष्ठ वकील ॲड. एस.एन. इनामदार  यांनी मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ललकारी, दोन मुले, सून आणि नातू असा परिवार आहे. संगीतकार कौशल इनामदार आणि दिग्दर्शक विशाल इनामदार यांचे ते वडील होत. 

कौशल इनामदार यांच्या वडिलांची कारकीर्द

एस.एन. इनामदार पुणे विद्यापीठात बीएमसीसी कॉलेजमधून वाणिज्य शाखेतून प्रथम आले. तसेच शासकीय विधी महाविद्यालयातून एलएलबीमध्ये ते प्रथम आले आणि सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. ज्येष्ठ वकील वाय.पी.पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली.  

पुढे १९८४ मध्ये एस. एन. इनामदार यांनी स्वतंत्र प्रॅक्टिस सुरू केली. ते किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड, किर्लोस्कर फेरस लिमिटेड, किर्लोस्कर लीजिंग अँड फायनान्स लिमिटेड, फोर्स मोटर्स लिमिटेड, सकाळ पेपर्स लिमिटेड, सुदर्शन केमिकल लिमिटेड, सुंदरम फायनान्स लिमिटेड, बृहन महाराष्ट्र शुगर सिंडिकेट लिमिटेड यांसारख्या कंपन्यांच्या संचालक मंडळावर होते. फिनोलेक्स ग्रुप, किर्लोस्कर प्रोप्रायटरी लिमिटेड आणि केपीटी लि. ते ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन, टीव्हीएस ग्रुप, कल्याणी ग्रुप आणि पूनावाला ग्रुपचे ते कर सल्लागार होते.

Web Title: Musician Kaushal Inamdar's father passes away at the age 79

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.