साईराज आणि छोट्या मायराचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; निरागस हावभावाने लावलं वेड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 13:18 IST2023-09-17T13:16:58+5:302023-09-17T13:18:08+5:30
साईराजचे नवे गाणे चाहत्यांच्या भेटीला आले आहे. साईराजसोबत लोकप्रिय बालकलाकार मायरा वायकुळदेखील पाहायला मिळत आहे.

Myra Vaikul & Sairaj Kendre new Devbappa Song
'आमच्या पप्पांनी गणपती आणला' या गाण्यामुळे परळी तालुक्यातील साईराज केंद्रे राज्याच्या कानाकोपऱ्यांत पोहोचलाय. या गाण्यातील साईराजच्या निरागस हावभावाने सगळ्यांचे मन जिंकून घेतले. या व्हिडीओला अवघ्या काही दिवसांत कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. आपल्या निरागस हावाभावाने साईराज सगळ्यांचा लाडका बनला आहे. आता साईराजचे नवे गाणे चाहत्यांच्या भेटीला आले आहे. साईराजसोबत लोकप्रिय बालकलाकार मायरा वायकुळदेखील पाहायला मिळत आहे.
गायक, संगीतकार प्रवीण कोळी यांच्या 'देवबाप्पा' या गाण्यामध्ये साईराजला काम करण्याची संधी मिळाली. हे गाणे सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. यामध्ये साईराज आणि मायरा यांच्या हातात बालगणेशाची मूर्ती दिसत आहे. दोन्ही बालकलाकारांनी अपल्या अभिनयाने लोकांना भुरळ घातली आहे.
साईराज हा दीड वर्षाचा असल्यापासून Instagramm वर रिल्स बनवत आहे. सुरुवातीला ‘ए आई मला पावसात जाऊ दे” हा साईराजचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता पुन्हा साईराजचा आमच्या पप्पांनी गणपती आणला या गाण्यावरील व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. साईराजचे आई-वडील दोघेही खासगी कंपनीत नोकरीला आहे. साईराजला असणारी आवड पाहून त्याच्या वडिलांनी त्याचे व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली होती.
तर मायरा झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिकातून घराघरात पोहचली. या मालिकेत बालकलाकार मायरा वायकुळने ‘परी’ची भूमिका साकारली होती. निरागस अभिनयाने मायराने सर्वांचे मन जिंकले. सध्या मायरा ‘नीरजा एक नई पहचान’ या हिंदी मालिकेत काम करत आहे. सध्या इन्स्टाग्रामवरही तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. युट्यूबवर Myra’s corner हे मायराचे चॅनल आहे.