​ एक रहस्यमय वेबसिरिज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2016 12:37 PM2016-12-26T12:37:18+5:302016-12-26T12:37:18+5:30

सध्या इंटरनेटवर अनेक वेबसिरिज धुमाकुळ घालत आहेत. नेटिझन्सना देखील वेगवेगळ््या वेबसिरिज पाहायला आवडत असल्याने त्यांच्यासाठी सध्या इंटरनेटवर विविध वेब ...

A mysterious webseries | ​ एक रहस्यमय वेबसिरिज

​ एक रहस्यमय वेबसिरिज

googlenewsNext
्या इंटरनेटवर अनेक वेबसिरिज धुमाकुळ घालत आहेत. नेटिझन्सना देखील वेगवेगळ््या वेबसिरिज पाहायला आवडत असल्याने त्यांच्यासाठी सध्या इंटरनेटवर विविध वेब सिरिज येत आहेत. प्रेक्षकांना रहस्यमय कथा पाहायला जास्त आवडतात. मग आता वेब सिरिजमध्ये देखील असाच एक विषय आलेला होता. मराठमोळा मुलगा जयेश राजे याच्या संकल्पनेतून साकारलेली रेस्ट इन पीस ही वेब सिरिज अंगावर काटा आणणारी आहे. अंगावर शहारे आणणारी थरारक गुढ वेब सिरियल 'रेस्ट इन पीस'  इंटरनेटवर ८ आॅक्टोबरपासून सुरू झाली होती. सायको थ्रिलर असलेल्या या वेब मालिकेचे एकूण १० भाग प्रदर्शित होणार होते. आता या मालिकेचा १० वा भाग प्रसिध्द होत असून ही मालिका आता समारोपाकडे झुकली आहे. मानसिकदृष्ट्या कमजोर असलेल्या लोकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडणाºया एका तरुण वेब डिझायनरची ही कथा आहे.हा वेब डिझायनर लोकांशी गोड बोलून काटा काढत असतो. ही संकल्पना आहे जयेश राजे यांची. मिस्टर एक्स हे पात्रही जयेश यामध्ये साकारत आहेत. याविषयी त्याने एका मुलाखतीत बºयाच गोष्टी उलगडल्या. या वेब सिरिजच्या संकल्पनेविषयी जयेश सांगतो, काही वषार्पूर्वी मी एक एकांकिका केली होती. त्याचे नाव होते आत्मविश्वास. त्यातील जी मध्यवर्ती व्यक्तीरेखा होती ती लोकांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करायची. आमच्या सर्वांच्या सामुहिक चर्चेत विषय झाला की, एखादी व्यक्ती लोकांना आत्महत्या करण्यास भाग पाडत असेल, तर अशी प्रभाव असलेली व्यक्ती असू शकेल का ? मग याबद्दल सायकलॉजिस्टशी बोलायला लागलो. काही डिप्रेस लोकांशी चर्चा केली. असे करत कथा तयार होत गेली. आम्ही त्याला टेक्नॉलॉजीची जोड दिली. सोशल मीडिया आज खूप महत्वाचा रोल प्ले करतो तर त्याचाच आम्ही वारप केला आणि ही वेब सिरिज तयार केली असल्याचे जयेशने सांगितले. 

Web Title: A mysterious webseries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.