एनफडीसीच्या फिल्म बाजार मध्ये 'दशक्रिया'ची निवड!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 05:42 AM2017-10-25T05:42:05+5:302017-10-25T11:12:05+5:30
राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या 'रंगनील क्रिएशन्स' निर्मित 'दशक्रिया' चित्रपटाची येत्या २० ते २४ नोव्हेंबर दरम्यान गोवा राज्यात होणाऱ्या एनफडीसीच्या फिल्म ...
र ष्ट्रीय पारितोषिक विजेत्या 'रंगनील क्रिएशन्स' निर्मित 'दशक्रिया' चित्रपटाची येत्या २० ते २४ नोव्हेंबर दरम्यान गोवा राज्यात होणाऱ्या एनफडीसीच्या फिल्म बाजार मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने निवडण्यात आलेल्या सहा मराठी चित्रपटांमध्ये निवड झाली आहे. हा चित्रपट येत्या १७ नोव्हेंबर २०१७ला महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक इत्यादी राज्यांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
'रंगनील क्रिएशन्स' निर्मित 'दशक्रिया' चित्रपटाला ६४ व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट (निर्मिती - दिग्दर्शन), सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता अशा चार पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. एका अत्यंत वेगळ्या विषयाची निवड करून पदार्पणातच दिग्दर्शकीय कौशल्याची चुणूक दाखवून दिग्दर्शक संदीप भालचंद्र पाटील यांनी चार राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहर उमटविली आहे.
बाबा भांड यांच्या प्रचंड गाजलेल्या 'दशक्रिया' या कादंबरीवर सूक्ष्म निरीक्षणासोबतच अभ्यासपूर्ण लिहिलेल्या पटकथेमुळे संजय कृष्णाजी पाटील यांना 'दशक्रिया' चित्रपटाने पहिले ‘सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथेचे’ राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिले. 'दशक्रिया'सारख्या अत्यंत संवेदनशील विषयासाठी मोठ्या धैर्याने आणि उत्साहाने पाठीशी उभ्या राहून आर्थिक आर्थिक पाठबळ देणाऱ्या कल्पना विलास कोठारी यांच्या रंग नील क्रिएशन्स ही निर्मितीतले सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचे राष्ट्रीय पुरस्कार पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या चित्रपटासाठी ५१ वर्षानंतर पहिल्यांदाच अभिनेते मनोज जोशी यांना राष्ट्रीय सन्मान मिळाला आहे.
प्रतिभावंत ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफर महेश अणे यांनी 'दशक्रिया'चा बॅकड्रॉप जिवंत केला असून त्यांच्या सिनेमॅटोग्राफीने 'दशक्रिया'च्या भव्येतेत अधिक भर पडली आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी, बालकलाकार आर्या आढाव, विनायक घाडीगावकर, अदिती देशपांडे, मिलिंद शिंदे, मिलिंद फाटक, उमा सरदेशमुख, अशा शेलार, नंदकिशोर चौघुले, संतोष मयेकर यांच्यासोबतच जवळपास दीडशेहून अधिक कलाकारांनी यात काम केले आहे.
एनफडीसीच्या फिल्म बाजार या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात २०१५ पासून मराठी चित्रपट महाराष्ट्र राज्य शासनातर्फे पाठविण्यात येत आहे. या महोत्सवात अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय निर्माते, दिग्दर्शक, समीक्षक तसेच चित्रपट रसिकांच्या उपस्थितीमुळे मराठी चित्रपटाला जागतिक स्पर्धेत सहभागी होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होत आहे.
Also Read : दिलीप प्रभावळकर आणि मनोज जोशी यांचा दशक्रिया हा चित्रपट १७ नोव्हेंबरला होणार प्रदर्शित