नागराज मंजुळे आणि रितेश देशमुख घेऊन येतायेत छत्रपती शिवाजी महाराजांची महागाथा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 04:07 PM2020-02-19T16:07:35+5:302020-02-19T16:10:51+5:30

रितेश देशमुखने त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करत या चित्रपटाविषयी त्याच्या चाहत्यांना माहिती दिली आहे.

Nagaraj Manjule and Riteish Deshmukh are coming along with the great story of Chhatrapati Shivaji Maharaj. | नागराज मंजुळे आणि रितेश देशमुख घेऊन येतायेत छत्रपती शिवाजी महाराजांची महागाथा

नागराज मंजुळे आणि रितेश देशमुख घेऊन येतायेत छत्रपती शिवाजी महाराजांची महागाथा

googlenewsNext
ठळक मुद्देशिवाजी… राजा शिवाजी… छत्रपती शिवाजी अशी या चित्रपटांची नावं असून या पोस्टसोबत रितेशने लिहिले आहे की, अभिमानाने सादर करत आहोत... तुम्हा सर्वांचा आशिर्वाद असू द्या.... जय शिवराय!

अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेले 'छत्रपती शिवाजी महाराज' यांच्या जीवनावर लवकरच एक चित्रपट येणार असून अभिनेता रितेश देशमुख प्रेक्षकांसाठी हा चित्रपट घेऊन येणार असल्याचे आपल्या सगळ्यांनाच गेल्या काही दिवसांपासून माहीत आहे. आज शिवजयंती निमित्त शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या चित्रपटाची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. 

रितेश देशमुखने त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करत या चित्रपटाविषयी त्याच्या चाहत्यांना माहिती दिली आहे. या चित्रपटाच्या या टीझरमध्ये या चित्रपटाच्या टीममधील मंडळींची नावे आपल्याला वाचायला मिळत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन सैराट फेम नागराज मंजुळे करणार आहेत. या चित्रपटाचे संगीत अजय-अतुल देणार आहेत. शिवाजी… राजा शिवाजी… छत्रपती शिवाजी अशी या चित्रपटांची नावं असून या पोस्टसोबत रितेशने लिहिले आहे की, अभिमानाने सादर करत आहोत... तुम्हा सर्वांचा आशिर्वाद असू द्या.... जय शिवराय! हे चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहेत. हा व्हिडिओ रितेशने शेअर केल्यानंतर केवळ एका तासात एक लाख 27 हजाराहून अधिक लोकांनी हा पाहिला आहे.  

नागराज मंजुळेने देखील या चित्रपटाचा टीझर ट्वीटरवर पोस्ट करत लिहिले आहे की, एखाद्या स्वप्नाच्या उंबरठ्यावर उभं राहणं म्हणजे हेच असावं कदाचित...आज शिवरायांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हे सांगायला लय आनंद वाटतोय की, 
रितेश देशमुख, अजय-अतुल यांच्या सोबतीने घेऊन येतोय शिवत्रयी
शिवाजी
राजा शिवाजी
छत्रपती शिवाजी
शिवरायांच्या जन्मदिनाच्या खूप साऱ्या सदिच्छा

Web Title: Nagaraj Manjule and Riteish Deshmukh are coming along with the great story of Chhatrapati Shivaji Maharaj.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.