नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांचा 'घर बंदूक बिर्याणी' OTTवर भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 05:10 PM2023-05-23T17:10:12+5:302023-05-23T17:10:55+5:30

Ghar Banduk Biryani : ‘घर बंदूक बिर्याणी’ चित्रपटाच्या जागतिक डिजिटल प्रीमियरची घोषणा झाली आहे.

Nagraj Manjule and Akash Thosar's 'Ghar Banduk Biryani' release on OTT | नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांचा 'घर बंदूक बिर्याणी' OTTवर भेटीला

नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांचा 'घर बंदूक बिर्याणी' OTTवर भेटीला

googlenewsNext

‘घर बंदूक बिर्याणी’ चित्रपटाच्या जागतिक डिजिटल प्रीमियरची घोषणा झाली आहे. बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या यशानंतर हा मराठी चित्रपट जगभरातील प्रेक्षकांसाठी 19 मे 2023 पासून फक्त झी5 वर उपलब्ध होणार आहे. झी स्टुडिओज आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते नागराज मंजुळे यांची निर्मिती असलेल्या घर बंदूक बिर्याणी या सिनेमातून दिग्दर्शक हेमंत अवताडे यांनी पर्दापण केले आहे. या सिनेमात नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि सायली पाटील मुख्य भूमिकेत आहेत. 

घर बंदुक बिर्याणी हा सिनेमा बंडखोरांचं वर्चस्व असलेल्या कोलागडच्या काल्पनिक परिसरात घडतो. कमांडर पल्लम (सयाजी शिंदे) आणि त्यांचे बंडखोर जंगलात लपून तिथल्या आमदाराचा बदला घेण्याचा कट रचत असतात. जवळच्याच गावात राजू (आकाश ठोसर) त्याची भावी पत्नी लक्ष्मीला (सायली पाटील) भेटणार असतो. लग्नासाठी तिच्या वडिलांची एकच अट असते आणि ती म्हणजे, मुलाकडे स्वतःचं घर हवं. गावातल्याच एका ढाब्यावर काम करणाऱ्या राजूसाठी सगळ्यात चवदार बिर्याणी बनवणं एकवेळ सोपं असतं, पण घर घेणं तितकंच अवघड असतं. या सगळ्यापासून दूर राया पाटील (नागराज मंजुळे) पुण्यात आपलं कर्तव्य इमानइतबारे करत असतो, पण त्याचमुळे तो अडचणीत येतो. त्याची बदली होते, ती थेट कोलागडमध्ये. एका क्षणी या तिघांचं आयुष्य समान बिंदूवर येतं. ते कसं याची गोष्ट घर बंदूक बिर्याणी या सिनेमात मनोरंजक आणि धमाल पद्धतीनं उलगडण्यात आली आहे. नाट्यमय घडामोडी आणि उंदीर- मांजराच्या पाठलागाप्रमाणे रंगणाऱ्या घर बंदूक बिर्याणीमध्ये प्रेम, विरह, नुकसान अशा सगळ्या भावना मांडण्यात आल्या आहेत. या धमाकेदार विनोदी व अ‍ॅक्शन सिनेमात सर्वच कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे.

अभिनेते व निर्माते नागराज मंजुळे म्हणाले, ‘घर बंदूक बिर्याणीची मांडणी चाकोरी मोडणारी आहे, कारण आतापर्यंत अत्याचार, दडपशाही आणि प्रेमाची कथा कधीच तिरकस विनोद, अ‍ॅक्शन आणि नाट्यमय पद्धतीने मांडण्यात आलेली नव्हती. सर्व कलाकार व तंत्रज्ञांनी या सिनेमासाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. लवकरच हा सिनेमा मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचेल व त्यांचेही मनोरंजन करेल.’

Web Title: Nagraj Manjule and Akash Thosar's 'Ghar Banduk Biryani' release on OTT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.