नंदू माधव व देविका दफ्तरदार झळकणार परी हूँ मैं या चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2017 05:04 AM2017-06-06T05:04:41+5:302017-06-06T10:34:41+5:30
अभिनेता नंदू माधव आणि अभिनेत्री देविका दफ्तरदार यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. मोजक्या पण हटके चित्रपटांमध्ये ...
अ िनेता नंदू माधव आणि अभिनेत्री देविका दफ्तरदार यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. मोजक्या पण हटके चित्रपटांमध्ये दिसणारे हे चतुरस्त्र कलाकार योगायतन फिल्मस् प्रस्तुत परी हूँ मैं या आगामी मराठी चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच याची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे निर्माते डॉ. राजेंद्र प्रताप सिंह असून या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शिलवंत करणार आहेत.
परी हूँ मैं या चित्रपटात एका मध्यमवर्गीय कुटुंबाचा आपले ध्येय गाठण्याचा प्रवास मांडण्यात आला आहे. कौटुंबिक नाट्य असणाऱ्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे. नंदू माधव आपल्याला या सिनेमात कुटुंबवत्सल पती, प्रेमळ वडील अशा भूमिकेत दिसणार आहेत तर आपल्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहणाऱ्या स्त्रीची व्यक्तिरेखा देविका दफ्तरदार साकारणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीत आता विविध प्रयोग होताना दिसत आहेत. मराठी सिनेमाच्या सशक्त आशयामुळे अमराठी निर्माते आणि प्रस्तुतकर्त्यांची रेलचेल मराठीत वाढताना दिसून येत आहे. निर्माते डॉ. राजेंद्र प्रताप सिंह यांच्या परी हूँ मैं या चित्रपटातील आमची केमिस्ट्री प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील असा विश्वास नंदू माधव आणि देविका दफ्तरदार यांनी व्यक्त केला आहे.
नंदू माधव आणि देविका दफ्तरदार यांच्यासोबतच या चित्रपटात श्रुती निगडे, फ्लोरा सैनी हे कलाकार आहेत. चित्रपटाची कथा इरावती कर्णिक यांची आहे. तर समीर साप्तीस्कर यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर कुणाल मेहता तर सहनिर्माते संजय गुजर असून कार्यकारी निर्माते भाविक पटेल आहेत.