'नवरा माझा नवसाचा २'मधील अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 10:09 AM2024-08-06T10:09:51+5:302024-08-06T10:11:11+5:30

मराठी सिनेइंडस्ट्रीतील आणखी एक अभिनेत्री लवकरच लग्न करणार आहे. तिने नुकताच गुपचूप साखरपुडा केला आहे.

'Navra Maza Navsacha 2' fame actress Hemal Ingale secretly made engagement, photos surfaced | 'नवरा माझा नवसाचा २'मधील अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो आले समोर

'नवरा माझा नवसाचा २'मधील अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो आले समोर

मराठी इंडस्ट्रीतील बऱ्याच कलाकारांनी यंदा लग्नगाठ बांधली. यात पूजा सावंत, शिवानी सुर्वे, तितीक्षा तावडे, योगिता चव्हाण यांचा समावेश आहे. तर शिवानी सोनार हिने साखरपुडा करत तिचे नाते जगजाहीर केले. आता मराठी सिनेइंडस्ट्रीतील आणखी एक अभिनेत्री लवकरच लग्न करणार आहे. तिने नुकताच गुपचूप साखरपुडा केला आहे. ही अभिनेत्री म्हणजे हेमल इंगळे (Hemal Ingale). तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत साखरपुडा केल्याचे जाहीर केले आहे.

हेमल इंगळेने सोशल मीडियावर साखरपुड्याचा फोटो शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये एक्स बॉयफ्रेंड असे लिहिले आहे. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव रोनक आहे. साखरपुड्यासाठी तिने निळ्या रंगाचा ड्रेस आणि गळ्यात छानसा नेकलेस घातला आहे. हेमल इंगळेने शेअर केलेल्या फोटोवर सध्या नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


मुळची कोल्हापूरची असलेल्या हेमल इंगळेने पर्यावरण संवर्धनावर आधारित असलेल्या सौंदर्यस्पर्धेत ‘मिस अर्थ इंडिया’ हा प्रतिष्ठित किताब मिळवला. दिल्लीत रंगलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातून पाच तर देशभरातून ३५ मुलींनी भाग घेतला होता आणि अंतिम फेरीत हेमल भारताची प्रतिनिधी म्हणून अव्वल ठरली होती. 'आस'मधून हेमल इंगळेने कलाविश्वात पदार्पण केले. अभिनय बेर्डेसोबत ‘अशी ही आशिकी’ या चित्रपटात ती झळकली होती. या चित्रपटातून ती घराघरात लोकप्रिय झाली. सध्या ती तिच्या आगामी नवरा माझा नवसाचा २ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. यामध्ये हेमल दिग्गज कलाकारांसोबत झळकणार आहे. तिचे चाहते तिला या चित्रपटात पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Web Title: 'Navra Maza Navsacha 2' fame actress Hemal Ingale secretly made engagement, photos surfaced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.