नवरात्री दिवस २ : पांढऱ्या रंगाच्या गेटअपमध्ये मराठी अभिनेत्रींनी शेअर केले फोटो, चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 08:00 PM2019-09-30T20:00:00+5:302019-09-30T20:00:43+5:30
नवरात्रीच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीतील काही अभिनेत्री सोशल मीडियावर नऊ रंगातील गेटअपमधील फोटो शेअर करणार आहेत.
नवरात्रीच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीतील काही अभिनेत्री सोशल मीडियावर नऊ रंगातील गेटअपमधील फोटो शेअर करणार आहेत. नऊ दिवस या अभिनेत्री त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या वेगवेगळ्या कलाकृती पोस्ट करताना दिसणार आहेत. आज नवरात्रीचा दुसरा दिवस असून आजचा रंग पांढरा आहे.
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी तेजस्विनी पंडितने ‘कामाख्या’च्या रुपातील फोटो पोस्ट करत प्रश्न विचारला आहे.
तिने या रुपाचं महत्त्व सांगत लिहिलं, ”वेद , पुराण आणि संस्कृतीचा आपला देश… प्रत्येक नव्या जीवाची निर्मिती होते योनी मधून आणि म्हणूनच माझ्या या रूपात माझ्या योनीची पूजा होते. वेद सांगतात स्त्री प्रमाणे नदीही रजस्व संस्कारा नंतर जीवनाची (पाण्याची) नवनिर्मिती करते तेव्हा त्या काळात तिला स्पर्श करणं टाळावे. जिथे नदीला देखील अश्याप्रमाणे सन्मान देण्याची रीत आहे तिथेच प्रत्येक वर्षी ३०,००० हून अधिक शिलांचं हनन होतंय, ज्या योनीची पूजा व्हावी तिच्यावर निर्घृण वार केले जातात हे कसं सहन करू मी ? दुधाचे दात देखील न आलेल्या माझ्या लेकी वासनेला बळी पडतात तेव्हा त्यासाठी कुणाला जबाबदार ठरवू मी?”
अभिनेत्री अश्विनी महांगडे नवरात्रीच्या निमित्ताने नऊ दिवस विविध प्रदेशाच्या पोशाखासोबत, रंगाची व प्रदेशाची माहिती सांगणार आहे.
तिने पांढऱ्या रंगाचं महत्त्व सांगताना केरळच्या संस्कृतीबद्दल सांगितलं आहे की, नवरात्री_दिवस_२ विविधतेतून नटलेला मी भारत रंग- पांढरा - केरळ संस्कृती हा रंग शांती आणि पावित्र्य यांचे प्रतीक मानला जातो. मोहिनीअट्टम हा शब्द मोहिनी नावाच्या शब्दापासून आला आहे, मोहिनीचे रूप वाईट शक्तींवर चांगले सामर्थ्य मिळवण्यासाठी हिंदुंचा देव भगवान विष्णू ने घेतले होते. केरळच्या अतिप्राचीन (निओलिथिक) काळातील मानवी वस्तीबाबत फारच कमी माहिती उपलब्ध आहे. इडुक्की जिल्ह्यात प्राचीन कालीन दगडांवर रचून तयार केलेल्या मानवनिर्मित गुहा आहेत. पाषाणयुगातील मानवी अस्तित्वाचे पुरावे वायनाड जिल्ह्यातील इडक्कल गुहेत सापडतात. केरळ व तमिळनाडू हे एकेकाळी सांस्कृतिक व भाषिक दृष्ट्या एकच होते व एकत्रित भूभागाचे नाव तमिळक्कम असे होते. केरळाच्या बाबतीतील पहिला उल्लेख अशोकाच्या शिलालेखात केरळपुत्रम असा आढळतो.
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने दुर्गेचे दुसरे रुप ब्रम्हचारिणी सादर केले आहे.