नेहा जोशी आणि पुष्कराज चिरपुटकर झळकणार या चित्रपटात, असा असणार त्यांचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 07:15 AM2019-09-08T07:15:00+5:302019-09-08T07:15:00+5:30

मोहित टाकळकर दिग्दर्शित ‘मीडियम स्पाइसी’ चित्रपटाचा प्रवास नावाप्रमाणेच लज्जतदार असून प्रदर्शनापूर्वी चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढत आहे.

Neha Joshi and Pukhraj Raj Chirupatkar will be featured in the movie | नेहा जोशी आणि पुष्कराज चिरपुटकर झळकणार या चित्रपटात, असा असणार त्यांचा अंदाज

नेहा जोशी आणि पुष्कराज चिरपुटकर झळकणार या चित्रपटात, असा असणार त्यांचा अंदाज

googlenewsNext

शहरी नातेसंबंधांभोवती गुंफण्यात आलेल्या ‘मीडियम स्पाइसी’ या रोमांचक चित्रपटाच्या निमित्ताने अनेक प्रतिभावंत कलाकार एकत्र आले आहेत. ललित प्रभाकर, सई ताम्हणकर आणि पर्ण पेठे यांच्या प्रमुख भूमिकांसह सागर देशमुख, जेष्ठ कलाकार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी यांच्या सहाय्यक भूमिका असलेला हा चित्रपट या वर्षीचा कलाकारांची मांदियाळी असणारा चित्रपट ठरणार आहे. दरम्यान, आता या चित्रपटात नेहा जोशी आणि पुष्कराज चिरपुटकर दिसणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी केली आहे. मोहित टाकळकर दिग्दर्शित ‘मीडियम स्पाइसी’ चित्रपटाचा प्रवास नावाप्रमाणेच लज्जतदार असून प्रदर्शनापूर्वी चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढत आहे.

नेहा जोशी हिची ओळख मराठी चित्रपटसृष्टीतील एक उत्तम अभिनेत्री अशी आहे. ‘फर्जंद’, ‘झेंडा’, ‘पोस्टर बॉईज’ आणि ‘नशीबवान’ यांसारख्या चित्रपटांमधून नेहाने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली असून, मागील वर्षी तिला ‘नशीबवान’ साठी राज्य पुरस्कारामध्ये उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच अभिनेता पुष्कराज चिरपुटकरला छोट्या पडद्यावरील त्याच्या भूमिकेसाठी रसिकांचे प्रेम मिळाले. गेल्या वर्षात  अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये त्याने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या असून त्यातील ‘मंत्र’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला राज्य पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. प्रतीभासंपन्न कलाकारांची मांदियाळी असलेला ‘मीडियम स्पाइसी’ प्रेक्षकांना निश्चितपणे आवडेल अशी आशा चित्रपटाच्या टीमकडून व्यक्त करण्यात येत आहे.’’
 

Web Title: Neha Joshi and Pukhraj Raj Chirupatkar will be featured in the movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.