नेहा जोशी बनली सहनिर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2016 03:44 PM2016-12-23T15:44:56+5:302016-12-23T15:44:56+5:30
का रे दुरावा या मालिकेतून प्रेक्षकांचे मन जिंकणारी अभिनेत्री नेहा जोशी हिने एका लघुपटासाठी सहनिर्मिती केली आहे. तिच्या या ...
![Neha Joshi became co-creator | नेहा जोशी बनली सहनिर्मिती Neha Joshi became co-creator | नेहा जोशी बनली सहनिर्मिती](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/420x315/cnxoldfiles/neha(12).jpg)
नेहा जोशी बनली सहनिर्मिती
क रे दुरावा या मालिकेतून प्रेक्षकांचे मन जिंकणारी अभिनेत्री नेहा जोशी हिने एका लघुपटासाठी सहनिर्मिती केली आहे. तिच्या या लघुपटाचे नाव उकळी असे आहे. या लघुपटामध्ये तिने सहनिर्मितीची जबाबदारी पार पाडली आहे. तसेच तिच्यासोबत विभावरी देशपांडे, उमेश जगताप, अभिजीत देशपांडे, सतीश आंबेकर यांचादेखील लघुपटाच्या निर्मितीमध्ये सहभाग असल्याचे कळत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता नेहाची नवीन इनिंग पाहायला मिळणार आहे. तसेच तिने या लघुपटासाठी अभिनयासोबत सहनिर्मितीची जबाबदारीदेखील पार पाडली आहे. हा लघुपट ओंकार कुलकर्णी हिने लिहीला आहे. जसं आपल्या मनामध्ये सुख, दु:ख, प्रेम अशा वेगवेगळया भावना असतात याबरोबरच हिंसा ही देखील भावना आपल्यामध्ये असते. मात्र बुद्धीचा वापर करून आपण त्या भावनेवर ताबा ठेवू शकतो. ज्यावेळी या हिंसेला वाट मिळते त्यावेळी ती कशा रूपाने बाहेर पडते. ही जी मूळप्रवृत्ती असते आपल्यामध्ये याविषयी हा लघुपट असणार आहे. नेहाने नाटक, मालिका आणि चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची चुणूक प्रेक्षकांना दाखविली आहे. पोस्टर बॉइज, स्वप्न तुझे नी माझे, झेंडा, हवा हवाई, सुंदर माझे घर असे अनेक चित्रपट केले आहेत. तसेच तिने एकापेक्षा एक अप्सरा आली या रियालिटी शोमध्येदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळाली. तसेच ती सध्या मराठी आणि हिंदी नाटकामध्येदेखील व्यग्र असल्याचे तिने यावेळी सांगितले. तसेच तिची का रे दुरावा या मालिकेतील निगेटिव्ह भूमिका फार कमी कालावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. तसेच नेहा सध्या ऐतिहासिक चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र असल्याचे कळत आहे.