नवरी नटली...! पाहा, नेहा पेंडसेच्या लग्नाचे फोटो; थाटामाटात पार पडला लग्नसोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 10:17 IST2020-01-06T10:13:53+5:302020-01-06T10:17:46+5:30
पाहा फोटो... ऐका नेहाचा ठसकेबाज उखाणा..

नवरी नटली...! पाहा, नेहा पेंडसेच्या लग्नाचे फोटो; थाटामाटात पार पडला लग्नसोहळा
मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे काल 5 जानेवारीला शार्दुल सिंग बयास याच्यासोबत लग्नबंधनात अडकली. पुण्यात मराठमोळ्या पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. या लग्नाचे काही फोटो समोर आले आहेत. बिग बॉस-12 ची स्पर्धक राहिलेल्या नेहाने आपल्या लग्नात महाराष्ट्रीयन लूकला पसंती दिली.
पेस्टल गुलाबी रंगाची नऊवारी साडी, चंद्रकोर टिकली, नथ असा तिचा पारंपरिक लूक होता. तर शार्दुल पांढºया रंगाचा कुर्ता आणि त्यावर गुलाबी रंगाचा फेटा अशा थाटात होता.
लग्नाच्या एक दिवस अगोदर नेहाचा साखरपुडा झाला. तिथेच संगीत सेरेमनीमध्येही नेहा आणि शार्दुलने मस्ती केली. या दोन्ही फंक्शनचे फोटो नेहाने इंस्टाग्रामवर शेअर केले होते.
नेहाचा पती शार्दुल हा महाराष्ट्रातील एका राजकीय कुटुंबातील आहेत. लग्नाआधी दीर्घकाळ नेहा व शार्दुल एकमेकांना डेट करत होते. यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.
यादरम्यान शार्दुलचा फोटो शेअर केल्यानंतर अनेकांनी शार्दुलला वजनावरून ट्रोल केले होते. यावर नेहाने खरमरीत प्रतिक्रिया दिली होती.
शार्दुलचा एंटरटेनमेंट इंडस्ट्रीशी दूरदूरपर्यंत संबंध नाही. तो एक बिझनेसमॅन आहे. अशात त्याला ट्रोल करणे लज्जास्पद आहे. तुला हाच भेटला का? अशा कमेंट करणे चुकीचे आहे, असे नेहा म्हणाली होती.
नेहाबद्दल सांगायचे तर तिने नेहाने बालकलाकार म्हणून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिने अभिनयक्षेत्रात करियर करण्यामागे तिच्या आईचा मोठा हात होता. केवळ १० वर्षांची असताना तिने सगळ्यात पहिल्यांदा कॅमेराला फेस केले होते.
तिने बालकलाकार म्हणून अनेक चित्रपट, मालिकांमध्ये देखील काम केले आहे. लवकरच ती ‘जून’ या आगामी मराठी चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मेननसोबत झळकणार आहे. या चित्रपटात नेहासोबत अभिनेता सिद्धार्थ मेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या दोघांव्यतिरिक्त किरण करमरकर व रेशम हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.