त्या घटनेमुळे नेहा शितोळे झाली आक्रमक, व्यक्त केली ही खंत आणि चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 01:05 PM2020-03-03T13:05:00+5:302020-03-03T13:05:00+5:30

अहमदनगरमध्ये झालेल्या घटनेने तर मन सुन्न झाले आहे. या सगळ्या घटना पाहून जगण्यातला भाव कुठेतरी हरवत चालला आहे असे वाटते.

Neha Shitole Raised voice against Growing Crime Rate in India-SRJ | त्या घटनेमुळे नेहा शितोळे झाली आक्रमक, व्यक्त केली ही खंत आणि चिंता

त्या घटनेमुळे नेहा शितोळे झाली आक्रमक, व्यक्त केली ही खंत आणि चिंता

googlenewsNext

सध्या सेलिब्रेटी चालू घडामोडी, राजकीय प्रसंग आणि इतर मुद्द्यांवर परखडपणे आपलं मत व्यक्त करत असतात. ट्विटर व फेसबुकच्या माध्यमातून ते बेधडकपणे आपली मतं मांडतात. त्यासोबतच वेळोवेळी सडेतोड उत्तरही देतात. नेहा शितोळेही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते आहे. व्हिडीओच्या माध्यमातून तिने देशातील आणि राज्यातील होणा-या गुन्हेगारी घटनांवर आपले मत व्यक्त केले आहे. Also Read https://www.lokmat.com/ahmadnagar/woman-strangled-and-beaten-retract-suit/


महिलांच्या सुरक्षेची जबाबबदारी कोणाची...दिवसाढवळ्या आजही महिलांवर होतायेत अत्याचार.....रात्रीच्या वेळी महिलांची सुरक्षा धाब्यावर.... अशा अनेक गोष्टींनी आज मनात काहूर माजला आहे. कधी होणार आपली यातून सुटका अशी खंत नेहा शितोळेने व्यक्त केली आहे. 


देशात वाढत्या गुन्हेगारीचं प्रमाण पाहता आपल्याकडे गुन्हेगारांनाही कायद्याची भिती वाटत नाही. गुन्हेगारी प्रवृत्ती वाढू लागलीय. याला आळा घालण्यासाठी कडक कायद्यांची सुरूवात होणे गरजेचे आहे. अहमदनगरमध्ये झालेल्या घटनेने तर मन सुन्न झाले आहे. या सगळ्या घटना पाहून जगण्यातला भाव कुठेतरी हरवत चालला आहे असे वाटते. 


अनेक मालिका आणि मराठी चित्रपटातून आजवर आपल्या भेटीला आलेली अभिनेत्री नेहा शितोळे  मराठी बिग बॉसमध्येही झळकली होती.नेहा शितोळे हे नाव 'फू बाई फू' शोमुळे घराघरात पोहोचले. 'सॅक्रेड गेम्स'मध्येही नेहाने आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे.'देऊळ' या मराठी सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्री नेहाने पदार्पण केले होते. त्यानंतर तिनं 'पोस्टर गर्ल', 'पोपट', 'दिशा' आणि 'सुरसपाटा' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे
 

Web Title: Neha Shitole Raised voice against Growing Crime Rate in India-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.