प्रेमाची नवी परिभाषा मांडणार....TTMM
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2016 04:21 AM2016-03-19T04:21:37+5:302016-03-18T21:21:37+5:30
बॉलिवूड आणि हॉलिवूड मध्ये प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केला जातो. मराठी चित्रपटातही नाविन्यपूर्ण व चांगल्या विषयांची निवड ...
ब लिवूड आणि हॉलिवूड मध्ये प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केला जातो. मराठी चित्रपटातही नाविन्यपूर्ण व चांगल्या विषयांची निवड जाणिवपूर्वक चित्रपट निर्माते करू लागले आहेत. आणि मराठी प्रेक्षकही वेगळ्या विषयाकडे आकर्षिला जातो. हीच बाब लक्षात घेऊन संस्कृती सिनेव्हिजनतर्फे ‘TTMM’ या आगळ्या वेगळ्या विषयाची निर्मिती करण्यात आली आहे.
संदेश म्हात्रे निर्मित, गिरीश मोहिते दिग्दर्शित या चित्रपटाचा मुहूर्त एका प्रेमगीताच्या चित्रीकरणाने नुकताच झाला.
गिरीश मोहिते यांनी आपल्या आगामी चित्रपटातून प्रेमाची नवी परिभाषा, नवी संकल्पना, नात्यांची नवी परिमाणं, मानवी संबंधातील नवीन प्रवाह या विषयीचा वेध घेतला आहे.
या चित्रपटात रसिकांना आपल्या दमदार कथानकासोबतच अभिनेता सुबोध भावे व अभिनेत्री दीप्ती देवी ही फ्रेश जोडीचा अभिनय पाहायला मिळणार आहे. या दोघांसोबत मुख्य भूमिकेत अतुल परचुरेही आहेत. चित्रपटाचे सहनिर्माते सचिन भोसले तर लेखन संजय पवार यांचे आहे. तसेच संगीत अविनाश-विश्वजीत यांचं आहे.