नोटाबंदीमुळे नवीन चित्रपट-मालिका लांबणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2016 11:51 AM2016-12-09T11:51:02+5:302016-12-09T11:51:02+5:30
केंद्र सरकारने घेतलेल्या ५०० व १००० च्या नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका अनेक क्षेत्रांमध्ये पहायला मिळतो आहे, यामध्ये मनोरंजन क्षेत्राचा देखील ...
ेंद्र सरकारने घेतलेल्या ५०० व १००० च्या नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका अनेक क्षेत्रांमध्ये पहायला मिळतो आहे, यामध्ये मनोरंजन क्षेत्राचा देखील समावेश आहे. सिनेमा,नाटक यासारख्या मनोरंजन क्षेत्राकडे कॅश नसल्याने प्रेक्षकांनी पाठ फिरवली, यामुळे मनोरंजन, नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टींना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. चॅनेलवरून जाहिराती देखील कमी झाल्या आहेत. असे आता किती दिवस राहणार असा प्रश्न आता उभा राहिला आहे. साठे महाविद्यालयात विनय आपटे यांच्या तिसºया स्मृतीदिनानिमित्त आयोजित केलेल्या परिसंवादामध्ये नवीन अर्थनितीमुळे मनोरंजन नाट्यसृष्टीची आव्हाने या परिसंवादात अभिनेता सुनील बर्वे, भरत दाभोळकर, मुक्ता बर्वे, अर्थतज्ज्ञ अच्युत गोडबोले, निखिल साने, निमार्ता श्रीरंग गोडबोले यांनी आपली मते मांडली.यावेळी चित्रपट क्षेत्रात कशाप्रकारे नोटाबंदीचा परिणाम झाला याबाबत अच्युत गोडबोले यांनी आपले मत मांडले. नोटाबंदीमुळे पैसे नसल्यामुळे प्रेक्षकांनी चित्रपट व नाटक या मनोरंजन क्षेत्राकडे पाठ फिरवल्याचे चित्र पहायला मिळते आहे. मात्र आता तरी कमी प्रमाणात नाटक चालू आहे, त्याकडे प्रेक्षक जात आहेत परंतु येत्या काळात असच चालू राहिले तर नक्की याचा फटका बसेल असे सुनील बर्वे , यांनी सांगितले. नोटाबंदीमुळे बाजारात कंपन्यांची उत्पादने विकली जात नसल्याने अनेक कंपन्यांनी जाहिरातींचा खर्च कमी केला आहे, यामुळे चॅनेलवरुन जाहिराती गायब झाल्या आहेत. ४० टक्क्यांपेक्षा जास्त जाहिराती कमी झाल्या आहेत. तर पेटीएम, मोबाईल सिमकार्डच्या जाहिराती सुरु आहेत .हिंदुस्तान लिव्हर देशातील सर्वात मोठ्या जाहिरातदाराने ५०टक्के जाहिराती कमी केल्या आहेत. कॅडबरी,गोदरेज,आॅटोमोबाईल इंडस्ट्रीच्या जाहिराती बंद झाल्याचे नितीन वैद्य यांनी या कार्यक्रमादरम्यान सांगितले. त्यामुळे अनेक निमार्ते, नाटककार यांनी आपले डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणारे चित्रपट चार ते पाच महिने लांबणीवर टाकले आहेत. आणि आता चित्रपट ,नाटक,नवीन सुरु होणाºया मालिका किती दिवस पुढे ढकल्या जातील, असा प्रश्न उभा राहिला आहे.