दिग्दर्शक विनोद लव्हेकरची नवी इनिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2017 11:56 AM2017-07-26T11:56:26+5:302017-07-26T17:26:26+5:30
समीर विद्वांस दिग्दर्शित 'मला काहीच प्रॉब्लेम नाही'या आगामी मराठी चित्रपटात आजवर पडद्यामागे राहून आपलं मनोरंजन करणारे दिग्दर्शक विनोद लव्हेकर ...
स ीर विद्वांस दिग्दर्शित 'मला काहीच प्रॉब्लेम नाही'या आगामी मराठी चित्रपटात आजवर पडद्यामागे राहून आपलं मनोरंजन करणारे दिग्दर्शक विनोद लव्हेकर आता अभिनयाद्वारे प्रथमच रुपेरी पडद्यावर झळकताना आणि आपलं मनोरंजन करताना दिसून येणार आहेत.'अग्निहोत्र', 'एका लग्नाची दुसरी गोष्ट', 'एका लग्नाची तिसरी गोष्ट', 'दिल दोस्ती दुनियादारी','बनमस्का' यांसारख्या एकापेक्षा एक मनोरंजक आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या मालिकांमुळे दिग्दर्शक म्हणून विनोद लव्हेकर आपणांस परिचयाचे आहेत. आजवर दिग्दर्शक म्हणून जरी नावाजले गेले असले तरीही त्यांच्यात दडलेली अभिनय कला 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी अचूक ओळखलेली आहे. ललित कला केंद्रातील एम. ए. इन ड्रामा ची पदवी पटकवलेले विनोद लव्हेकर 'वाघाची गोष्ट'या एकपात्री शो मुळे अनुवादक, दिग्दर्शक व अभिनेता म्हणून संपूर्ण मराठी फिल्म इंडस्ट्रीत नावाजले गेले. खुद्द विजय तेंडुलकर यांकडून शाबासकीची कौतुकास्पद थाप त्यांना आशीर्वाद म्हणून मिळालेली आहे.अभिनयाला छंद आणि दिग्दर्शनाला आपलं प्रोफेशन बनवून त्यांनी 'माझ्या वाटणीचं खरं खुरं' यांसारख्या अव्वल नाटकांतून आपली अभिनयाची आवड जपली आहे. नाटकांतील त्यांचा अभिनय पाहता त्यांच्यातील खऱ्या अभिनेत्याला रुपेरी पडद्यावर आणण्याचं काम केले आहे.'मला काहीच प्रॉब्लेम नाही' चित्रपटाद्वारे विनोद लव्हेकर एक अभिनेता म्हणून चित्रपट सृष्टीत पदार्पण करत आहेत. आपण ज्यांच्या दिग्दर्शकीय दृष्टीतून अवतरलेल्या कलाकृतींचा जसा आस्वाद घेतला तसाच त्यांच्यातील छुप्या अभिनय कलेचा आस्वाद घेण्यासाठी पी. एस. छतवाल, रिचा सिन्हा, रवि सिंग निर्मित आणि समीर विद्वांस दिग्दर्शित 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' चित्रपट येत्या २८ जुलैला संपूर्णमहाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.