​केदार शिंदे दिग्दर्शित नवा मराठी चित्रपट 'रायबाचा धडाका'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2017 10:41 AM2017-07-14T10:41:21+5:302017-07-14T16:11:21+5:30

तेलंगणातील हैद्राबादस्थित तेलगू चित्रपटसृष्टीत अग्रगण्य असलेल्या श्री विजयासाई प्रॉडक्शनने आता मराठी चित्रपटसृष्टीत उडी घेतली आहे. त्यांनी यासाठी आघाडीचा दिग्दर्शक ...

New Marathi film directed by Kedar Shinde, 'Raiba Chadka' | ​केदार शिंदे दिग्दर्शित नवा मराठी चित्रपट 'रायबाचा धडाका'

​केदार शिंदे दिग्दर्शित नवा मराठी चित्रपट 'रायबाचा धडाका'

googlenewsNext
लंगणातील हैद्राबादस्थित तेलगू चित्रपटसृष्टीत अग्रगण्य असलेल्या श्री विजयासाई प्रॉडक्शनने आता मराठी चित्रपटसृष्टीत उडी घेतली आहे. त्यांनी यासाठी आघाडीचा दिग्दर्शक केदार शिंदे यांची निवड केली आहे. 'रायबाचा धडाका' असे या चित्रपटाचे नाव असून 'लवासा', 'आळंदी', 'मुंबई', 'ठाणे', 'पुणे' इत्यादी शहरांमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. 
'रायबाचा धडाका' या चित्रपटातून आल्हाद अंडोरे आणि राधिका या दोन नव्या कलाकारांचे पदार्पण होणार आहे. त्यांच्या लुक बाबत कमालीची गुप्तता प्रॉडक्शन हाऊसने बाळगली आहे. तसेच या शिवाय त्यांच्यासोबत कोणते कलाकार काम करणार यांची नावेही सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. लवकरच त्यांचा खुलासा प्रॉडक्शन हाऊलतर्फे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
तेलगू सिनेमाच्या भव्य यशाचा नवा फॉर्मुला आजमावताना मराठी मातीतले सत्व कुठे हरवू नये यासाठी चित्रपटाची टीम विशेष प्रयत्न करत आहे. मराठी चित्रपटांचा इतिहास, प्रेक्षकांची आवड आणि स्पर्धा यांचा विचार करून त्यांनी मराठी चित्रपटाच्या निर्मितीत आपले पाऊल टाकले आहे.
रायबा आणि शुभ्रा यांच्या प्रेमाची कथा या चित्रपटात रेखाटण्यात आली आहे. अत्यंत हलकीफुलकी मनोरंजनप्रधान कौटुंबिक अशी ही गोष्ट आहे. रायबा आणि शुभ्रा ही नवी जोडी या चित्रपटामुळे प्रेक्षकांना मिळणार आहे. चित्रपटाला फ्रेश लूक देण्यासाठी अत्यंत देखणी आणि ग्लॅमरस जोडीची निवड करून या निर्माता दिग्दर्शक मंडळींनी यशस्वी वाटचाल केली आहे.
प्रसिद्ध डीओपी सुरेश देशमाने यांची सिनेमॅटोग्राफी आणि पंकज पडघम यांचे श्रवणीय संगीत ही आणखी एक या चित्रपटाची जमेची बाजू आहे. 

Web Title: New Marathi film directed by Kedar Shinde, 'Raiba Chadka'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.