पूजा सावंतच्या ऑस्ट्रेलियाच्या घरी नवीन मेंबर दाखल, फोटो शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 11:21 AM2024-09-03T11:21:04+5:302024-09-03T11:21:32+5:30

Pooja Sawant : अभिनेत्री पूजा सावंत सध्या वैवाहिक आयुष्यात व्यग्र आहे.

New member joins Pooja Sawant's house in Australia, shares photos and says... | पूजा सावंतच्या ऑस्ट्रेलियाच्या घरी नवीन मेंबर दाखल, फोटो शेअर करत म्हणाली...

पूजा सावंतच्या ऑस्ट्रेलियाच्या घरी नवीन मेंबर दाखल, फोटो शेअर करत म्हणाली...

अभिनेत्री पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण हे लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. काही महिन्यांपूर्वी पूजा सावंतने सिद्धेशसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर पूजा ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली आहे. ती कामानिमित्त भारत आणि परदेशात वारी करताना दिसते. ती परदेशात असली तरी सोशल मीडियावरून चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान आता तिच्या घरी नवीन मेंबर दाखल झाला आहे. तिने फोटो शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे.

अभिनेत्री पूजा सावंत हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत तिच्या घरी नवीन सदस्य दाखल झाल्याचे सांगितले आहे. हा सदस्य म्हणजे तिने नवीन झाड आणले आहे. तिने फोटो शेअर करत लिहिले की, घरात आणखी आनंदी रंग जोडले आहेत. नवीन आनंदी सदस्य. आनंदी झाड. 


अभिनेत्री पूजा सावंतने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर आपले स्थान निर्माण केले आहे. सध्या ती तिच्या वैवाहिक जीवनात व्यग्र आहे. पूजा आणि सिद्धेश फेब्रुवारी महिन्यात लग्नबंधनात अडकले. मुंबईत त्यांचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. त्यानंतर पूजा नवऱ्यासोबत ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली. तिथून ती चाहत्यांना अपडेट देताना दिसते. पूजा शेवटची मुसाफिरा या चित्रपटात झळकली होती. यात तिच्यासोबत पुष्कर जोग, दिशा परदेशी आणि पुष्कराज चिरपुटकर हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.  

Web Title: New member joins Pooja Sawant's house in Australia, shares photos and says...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.