नव्या फोटोशूटमध्ये मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या या अभिनेत्रीला ओळखणं झालं होतं कठीण, फोटोंना मिळतेय पसंती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 04:06 PM2021-08-04T16:06:25+5:302021-08-04T16:06:50+5:30
मराठमोळ्या या अभिनेत्रीच्या नव्या फोटोशूटला मिळतेय चाहत्यांची पसंती
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने मालिका, नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. शेवटची ती अग्गंबाई सासूबाई मालिकेत शुभ्राच्या भूमिकेत पहायला मिळाली होती. या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. मात्र सध्या ती छोट्या पडद्यावर दिसत नसली तरी ती सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते आणि या माध्यमातून आपल्या चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतेच तिने काही फोटो शेअर केले होते. ते पाहून तिला ओळखणं कठीण झाले होते.
तेजश्री प्रधानने नवीन फोटो सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. यात तिने पीच रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. फोटो शेअर करत तिने लिहिले की, मला नेहमीच परी बनण्याची इच्छा होती. जेव्हा मी लहान होते तेव्हा एक दिवस देवाला म्हणाले की, मला अशा करिअरमध्ये आण जिथे मी सर्व परीकथा जगू शकेन. आनंदी जीवन.
तेजश्री प्रधानच्या या नव्या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळते आहे. तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
तेजश्री प्रधान शेवटची अग्गंबाई सूनबाई मालिकेत दिसली होती. या मालिकेत तिने साकारलेली शुभ्राची भूमिका प्रेक्षकांना खूपच भावली होती. मालिका संपल्यानंतरही तिची भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिली आहे.
याशिवाय तेजश्री प्रधान लवकरच हिंदी चित्रपट बबलू बॅचलरमध्ये झळकणार आहे. यात तिच्यासोबत शर्मन जोशी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाआधी शर्मन जोशी आणि तेजश्री यांनी एका नाटकात काम केले होते. या नाटकाला चांगलीच पसंती मिळाली होती. त्यामुळे आता मोठ्या पडद्यावर त्यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.