रंगभूमीवर नवीन नाटक 'सोनाटा'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:11 AM2016-01-16T01:11:30+5:302016-02-04T14:32:48+5:30

आपल्या आसपासच्या परिस्थितीचा थोडा धांडोळा घेतला तर दिसेल, की मुलींच्या विवाहाची वर्षे करिअरमुळे लांबत चालली असून, अविवाहित राहून स्वतंत्र ...

The new play Sonata | रंगभूमीवर नवीन नाटक 'सोनाटा'

रंगभूमीवर नवीन नाटक 'सोनाटा'

googlenewsNext
ल्या आसपासच्या परिस्थितीचा थोडा धांडोळा घेतला तर दिसेल, की मुलींच्या विवाहाची वर्षे करिअरमुळे लांबत चालली असून, अविवाहित राहून स्वतंत्र लाईफ जगण्याकडे त्यांचा कल वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर चाळिशीतील तीन अविवाहित महिलांचे जीवन आणि त्यांची अखंडित मैत्री यावर भाष्य करणारे 'सोनाटा' हे नाटक नुकतेच रंगभूमीवर सादर झाले. मुंबई युनिव्हर्सिटीने प्रस्तुत केलेले हे नाटक महेश एलकुंचवार यांच्या लेखणीतून उतरले असून, राजेंद्र बडे यांनी दिग्दर्शन केले आहे. संस्कृतची प्राध्यापिका मनीषा, बँकेतील अधिकारी डोलन आणि पत्रकार शुभदा या तिघींभोवती या नाटकाचे कथानक फिरते. या भूमिका डॉ. निधी पटवर्धन, कविता अमरजित आणि लतिका सावंत त्यांनी साकारल्या आहेत. या महिलांच्या एकत्रितपणातील एकटेपणा प्रेक्षकांना अस्वस्थ आणि अविस्मरणीय असा अनुभव देतो.

Web Title: The new play Sonata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.