आठशे कलाकार करणार न्यू रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2016 09:55 AM2016-07-21T09:55:02+5:302016-07-21T15:28:31+5:30

Exculsive - बेनझीर जमादार            गोवा कला अकादमी यांच्यावतीने काव्यहोत्र नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ...

New record for doing eight performers | आठशे कलाकार करणार न्यू रेकॉर्ड

आठशे कलाकार करणार न्यू रेकॉर्ड

googlenewsNext
Excu
lsive - बेनझीर जमादार
          
गोवा कला अकादमी यांच्यावतीने काव्यहोत्र नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या काव्यवाचन कार्यक्रमामध्ये विविध प्रदेशातील तसेच देशाभरातून आठशे कलाकार पहिल्यांदाच एकत्रित येऊन काव्यवाचन करून एक न्यू रेकॉर्ड करणार असल्याचे अभिनेता सुनिल बर्वे यांनी लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले. सुनिल म्हणाला,खरचं गोव्यामध्ये मोठया प्रमाणात कलाप्रेमी आहेत. त्यांनी काव्यवाचनाला एवढे मोठे व्यासपीठ करून देणे ही आनंदाची गोष्ट आहे. तसेच हा कार्यक्रम  ७६ तासांचा असून ,या अकादमीचे हे दुसरे वर्षे आहे. येथे हिंदी,तामिळ अशा अनेक भाषेतील कलाकार देखील असणार आहेत. तसेच माझ्यासोबत तुषार दळवी, प्रतिक्षा लोणकर, सावनी रविंन्द्र असे आदि कलाकार आहेत. या अकादमीचे दुसरे वर्षे असून गेल्या वर्षी ४८ तास हा कार्यक्रम रंगला होता. गोव्याचे रसिक खरचं कलेला भरभरून प्रतिसाद देत असल्याने एक वेगळाच आनंद मिळतो. हा कार्यक्रम २१ ते २४ जुलै यादरम्यान आयोजित करण्यात आला आहे. 


Web Title: New record for doing eight performers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.