मराठी पाऊल पडते पुढे,या सुपरहिट मराठी सिनेमांच्या इतर भाषेतील रिमेकने रुपेरी पडद्यावर घातला धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 10:18 AM2018-04-30T10:18:55+5:302018-05-02T10:41:14+5:30

मराठी सिनेमा दिवसेंदिवस कात टाकतो आहे. विविध आशयघन आणि दर्जेदार कथानक असलेले सिनेमा मराठीत येत आहेत. मराठीत सिनेमा नवनवीन ...

Next step, this superhit remake of other Marathi films will be played on a silver screen. | मराठी पाऊल पडते पुढे,या सुपरहिट मराठी सिनेमांच्या इतर भाषेतील रिमेकने रुपेरी पडद्यावर घातला धुमाकूळ

मराठी पाऊल पडते पुढे,या सुपरहिट मराठी सिनेमांच्या इतर भाषेतील रिमेकने रुपेरी पडद्यावर घातला धुमाकूळ

googlenewsNext
ाठी सिनेमा दिवसेंदिवस कात टाकतो आहे. विविध आशयघन आणि दर्जेदार कथानक असलेले सिनेमा मराठीत येत आहेत. मराठीत सिनेमा नवनवीन प्रयोग केले जात आहेत.मराठी सिनेमाचा डंका राज्यात, देशातच नाही तर सातासमुद्रापार वाजतो आहे. मराठी सिनेमा राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटवत आहेत. शिवाय मराठी सिनेमांची कीर्ती ऑस्कर तसंच विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांपर्यंत पोहचली आहे.त्यामुळेच की काय गेल्या काही दिवसांत मराठी सिनेमांची बॉलीवुडसह इतर भाषिक दिग्दर्शकांना भुरळ पडतेय. मराठी सिनेमांचे इतर भाषांमध्यहीे रिमेक तयार होत आहेत. 


१. सैराट


मराठीतील सुपरडुपर हिट सिनेमा म्हणजे सैराट. झिंग झिंग झिंगाटच्या तालावर या सिनेमानं रसिकांना अक्षरक्षा याड लावलं. सिनेमाच्या कथेपासून सगळ्याच गोष्टी खास होत्या. त्यामुळे तिकीट खिडकीवरही सैराटने सगळे रेकॉर्ड मोडले. रसिकांप्रमाणेच सैराटची भुरळ बॉलीवुडलाही पडली. त्यामुळे बॉलीवुडचा डॅडी दिग्दर्शक करण जोहर सैराटचा रिमेक बनवत आहे. सध्या बॉलीवुडमध्ये सैराटचा रिमेक ‘धडक’ची जोरदार चर्चा सुरु आहे. या सिनेमात शाहिद कपूरचा धाकटा भाऊ इशान खट्टर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची कन्या जान्हवी कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


२. मुंबई-पुणे-मुंबई


सतीश राजवाडे दिग्दर्शित मुंबई-पुणे-मुंबई हा सिनेमा रसिकांना भावला. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्या अभिनयाची जुगलबंदी रसिकांना भावली होती. मुंबई-पुणे-मुंबई या सिनेमाला मिळालेले यश पाहून त्याचा हिंदीत रिमेक बनवण्यात आला. मुंबई-दिल्ली-मुंबई हा हिंदी सिनेमा २०१४ साली रुपेरी पडद्यावर झळकला. सतीश राजवाडे यांनीच या हिंदी सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. 


३. टाइमपास


पौगंडावस्थेतील प्रेम कहाणी आणि मुलांचे भावविश्व टाइमपास या सिनेमातून रुपेरी पडद्यावर मांडण्यात दिग्दर्शक रवी जाधव यशस्वी ठरला. टाइमपास या सिनेमाला रसिकांनी डोक्यावर घेतलं. याच सिनेमाच्या कथेची भुरळ तेलुगू दिग्दर्शकालाही पडली. त्यामुळेच आंध्र पोरी नावाचा तेलुगू रिमेक बनवण्यात आला. राज मुधीराज दिग्दर्शित या सिनेमात उतेज, श्रीकांत, श्रीमुखी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. प्रेम म्हणजे काही निव्वळ टाइमपास नाही असं सांगणा-या या सिनेमाचा रिमेकही रसिकांना भावला. 


४. अशी ही बनवाबनवी


सचिन पिळगावकर दिग्दर्शित अशी ही बनवाबनवी या सिनेमाने मराठी रसिकांना हसून हसून लोटपोट केलं. सचिन, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि इतर कलाकारांचा या सिनेमातील अभिनय आजही रसिकांच्या मनात घर करुन आहे. याच सिनेमाच पेइंग गेस्ट नावाचा हिंदी रिमेक बनवण्यात आला. यांत श्रेयस तळपदे, जावेद जाफरी, आशीष चौधरी, वत्सल सेठ, सेलिना जेटली, रिया सेन, नेहा धूपिया यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका होत्या.


५. लय भारी



हाथ भारी.... सगळंच लय भारी, या डायलॉगने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं होतं. मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखचा पहिलावहिला मराठी सिनेमा लय भारी सिनेमातील या डायलॉगने मराठी मनावर आणि तरुणाईवर जादू केली होती. रुपेरी पडद्यावरील रितेशचा अभिनय रसिकांना चांगलाच भावला होता. त्यामुळेच की काय या सिनेमाने तिकीट खिडकीवर कमाईचे नवनवे रेकॉर्ड्सही रचले होते. लय भारी सिनेमातील रितेशने साकारलेला 'माऊली' रसिकांच्या काळजात घर करुन गेला होता. लय भारी या सिनेमाच्या यशामुळे त्याचा ओडिया भाषेत रिमेक तयार करण्यात आला होता. जागा हातारे पाघा नावाचा ओडिया भाषेत सिनेमा बनवण्यात आला. मुरली कृष्णा दिग्दर्शित आणि अनुभव मोहंतीची प्रमुख भूमिका असलेला सिनेमा रसिकांना भावला. 


६. मितवा


तू ही रे मितवा म्हणत स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे यांनी मितवा या सिनेमातला प्रेमाचा त्रिकोण रसिकांना भावला होता. प्रेमाचे बंध आणि धागा मैत्रीचा यावर भाष्य करणा-या सिनेमाच्या कथेने मराठी रसिकांसह बंगाली दिग्दर्शकावरही मोहिनी घातली. मितवा या मराठी सिनेमाचा अमी जे के तोमार हा बंगाली रिमेक तयार करण्यात आला. रब्बी किनागी दिग्दर्शित या सिनेमात सयंतिका बॅनर्जी, अंकुश हाजरा आणि नुसरत जहाँ यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा बंगाली सिनेमा बंगाली रसिकांना चांगलाच भावला.

Web Title: Next step, this superhit remake of other Marathi films will be played on a silver screen.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.