निकिता दत्ताचा मराठमोळा अंदाज, 'घरत गणपती'मधून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 06:52 PM2024-07-01T18:52:26+5:302024-07-01T18:53:13+5:30

'कबीर सिंग' (Kabir Singh) चित्रपटात शाहिद कपूर(Shahid Kapoor)सोबत झळकलेली अभिनेत्री निकिता दत्ता (Nikita Dutta) सध्या चर्चेत आली आहे. हिंदी मालिका आणि चित्रपटानंतर आता ती मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतेय.

Nikita Dutta's Marathi film debut in Marathi cine industry with 'Gharat Ganapati' | निकिता दत्ताचा मराठमोळा अंदाज, 'घरत गणपती'मधून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण

निकिता दत्ताचा मराठमोळा अंदाज, 'घरत गणपती'मधून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण

'कबीर सिंग' (Kabir Singh) चित्रपटात शाहिद कपूर(Shahid Kapoor)सोबत झळकलेली अभिनेत्री निकिता दत्ता (Nikita Dutta) सध्या चर्चेत आली आहे. हिंदी मालिका आणि चित्रपटानंतर आता ती मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतेय. ती घरत गणपती या सिनेमात झळकणार आहे. या चित्रपटातील तिच्या मराठमोळ्या लूकची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. 

घरत गणपती चित्रपटात निकिता दत्ता मराठमोळ्या अंदाजात खूपच खुलून दिसतेय आणि तिचा मराठमोळा अंदाज सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. जरतारी काठाची जांभळया रंगाची पैठणी, केसांचा सैलसर अंबाडा त्यावर मोगऱ्याचा गजरा, कपाळी चंद्रकोर, नाकात नथ, गळ्यात पारंपरिक दागिने असा साजशृंगार करून निकिताने आपला मराठमोळा ठसका ऐटीत दाखविला आहे.

'घरत गणपती' हा माझा पहिलाच मराठी चित्रपट. पण या निमित्ताने मराठी चित्रपटाशी, कलाकारांशी आणि इथल्या मराठमोळ्या संस्कृतीशी ओळख झाली. इथले सण समारंभ, रितीरिवाज, पोशाख पेहराव या सगळ्यांनीच मला अक्षरशः भुरळ घातली, असं निकिता सांगते.  

पॅनोरमा स्टुडिओज सविनय सादर करीत आहेत नॅविअन्स स्टुडिओ यांच्या सहकार्याने मराठी चित्रपट ‘घरत गणपती’. २६ जुलैला हा चित्रपट आपल्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे  दिग्दर्शन नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांचे असून कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाची  निर्मिती केली आहे. 
 

Web Title: Nikita Dutta's Marathi film debut in Marathi cine industry with 'Gharat Ganapati'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.