निपुण धर्माधिकारीची चिमुकली म्हणते 'रोल कॅमेरा अन्...' इंटरनेटवरचा सर्वात क्युट Video बघा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 10:06 AM2023-02-28T10:06:38+5:302023-02-28T10:09:59+5:30

Like Father Like Daughter असं नेहमी म्हणलं जातं. त्याचीच प्रचिती या व्हिडिओतून येत आहे.

Nipun Dharmadhikari marathi director dayghter sanhitas cute video saying roll camera and action went viral | निपुण धर्माधिकारीची चिमुकली म्हणते 'रोल कॅमेरा अन्...' इंटरनेटवरचा सर्वात क्युट Video बघा

निपुण धर्माधिकारीची चिमुकली म्हणते 'रोल कॅमेरा अन्...' इंटरनेटवरचा सर्वात क्युट Video बघा

googlenewsNext

Nipun Dharmadhikari : मराठी मनोरंजनसृष्टीतील दिग्दर्शक निपुण धर्माधिकारीने त्याच्या कामातून स्वत:ला सिद्ध केले आहे. निपुणने सिनेमा, वेब सिरीज आणि नाटक अशा तिन्हींचे दिग्दर्शन केले आहे. त्याने दिग्दर्शित केलेल्या 'मी वसंतराव' या सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. निपुण सोशल मीडियावरही सक्रिय असतो ते त्याची २ वर्षांची लेक संहिता (Sanhita) मुळे. निपुणच्या शुटिंग सेटवरुन संहिताचा एक क्युट व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

Like Father Like Daughter असं नेहमी म्हणलं जातं. त्याचीच प्रचिती या व्हिडिओतून येत आहे. दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी याने लेक संहिताचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती खुर्चीत बसून 'रोल..कॅमेरा...अॅक्शन' असं म्हणताना दिसते. वडिलांचं बघून बघून लेकही लवकर शिकली आहे असंच म्हणावं लागेल. निपुणची बायको संचिताने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. याला कॅप्शनमध्ये निपुणने लिहिले, 'कुठे शिकली कोणास ठाऊक.'

निपुणच्या लेकीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.चित्रिकरणाच्या सेटवर वडिल कसे काम करतात हे बघत ही चिमुकली बरोब्बर शिकली आहे. फक्त २ वर्षांची निपुणची लेक रोल कॅमेरा अॅक्शन म्हणत ऑर्डर देताना दिसते. या व्हिडिओवर अनेक मराठी कलाकारांनीही कमेंट्स केल्या आहेत. सई ताम्हणकर, मिथिला पालकर, सारंग साठ्ये यांनी व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. इंटरनेटवरचा हा सर्वात क्युट व्हिडिओ असणार हे नक्की.

निपुण लवकरच 'लंपन' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतोय. याच सिनेमाच्या शूटिंग सेटवर त्याच्या लेकीचा हा व्हिडिओ त्याने शेअर केला आहे. याशिवाय त्याने दिग्दर्शित केलेला 'मी वसंतराव' सिनेमाचा राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला. इतकंच नाही तर ऑस्कर शर्यतीतही सिनेमा दाखल झाला होता.

Web Title: Nipun Dharmadhikari marathi director dayghter sanhitas cute video saying roll camera and action went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.