‘निर्भया’ निर्भीडपणे जगण्याचा मंत्र देईल: निर्माते अमोल अहिरराव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 10:12 AM2017-09-29T10:12:46+5:302017-09-29T15:42:46+5:30
चित्रपट हे मनोरंजनाचं सर्वाधिक लोकप्रिय माध्यम मानलं जातं. यापैकी काही चित्रपट निखळ मनोरंजन करतात, तर काही मनोरंजनासोबतच समाजप्रबोधनाचंही काम ...
च त्रपट हे मनोरंजनाचं सर्वाधिक लोकप्रिय माध्यम मानलं जातं. यापैकी काही चित्रपट निखळ मनोरंजन करतात, तर काही मनोरंजनासोबतच समाजप्रबोधनाचंही काम करीत असतात. आपणही समाजाचं काही देणं लागतो या भावनेतून काही निर्माते अंतर्मुख होऊन विचार करायला लावणाऱ्या विषयावर चित्रपट बनवत असतात. ६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘निर्भया’ या स्त्रीप्रधान चित्रपटातही अशाच प्रकारचं कथानक आहे. निर्माते अमोल अहिरराव यांनी स्वानंदी प्रोडक्शनच्या बॅनरखाली ‘निर्भया’ची निर्मिती केली आहे. अहिरराव यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी मनोरंजन आणि समाजप्रबोधन यांची अचूक सांगाड घालत त्यांनी ‘निर्भया’ची निर्मिती केली आहे.
ALSO READ : योगिता दांडेकरची प्रमुख भूमिका असलेला निर्भया ६ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित
प्रथमच चित्रपटनिर्मिती क्षेत्राकडे वळल्याबाबत तसंच चित्रपटाबाबत अहिरराव म्हणतात की, मनोरंजनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करावं या विचारधारेतून ‘निर्भया’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आज एकविसाव्या शतकात स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वाटचाल करीत असली तरी ती सुरक्षित नाही. देशातील सर्वोच्च पद असणाऱ्या राष्ट्रपतीपदापर्यंत जरी स्त्री पोहोचली असली, तरी तिच्यावर होणारे अत्याचार थांबलेले नाहीत. स्त्रियांवरील अत्याचारांना आळा घालण्याची, गुन्हेगारांना पाठीशी न घालता कठोर शासन करण्याची आवश्यकता आहे. स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. ‘निर्भया’ या चित्रपटात आम्ही हाच विचार मांडला आहे. दिग्दर्शक आनंद बच्छाव यांनी ऐकवलेली ‘निर्भया’ची कथा हृदयाला भिडली आणि समाजाला बोध देणाऱ्या याच कथानकाद्वारे निर्मितीकडे वळण्याचा निर्णय घेतला.
या चित्रपटात शीर्षक भूमिका साकारणाऱ्या योगिता दांडेकरने आपल्या व्यक्तिरेखेला अचूक न्याय देत साकारलेली निर्भया तरुणी आणि स्त्रियांना निर्भीडपणे जगण्याचा मंत्र देईल. मन हेलावून टाकणाऱ्या कथानकाला प्रसंगानुरूप गीत-संगीताची किनार जोडून त्यात उचित मनोरंजक मूल्येही गुंफण्यात आली आहेत. आजच्या तरुणींनी न झुकता कशा प्रकारे जीवन जगायला हवं हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने ‘निर्भया’ पाहण्याची गरज असल्याचंही अहिरराव यांनी सांगितलं.
बाबासाहेब सौदागर, अभिजीत कुलकर्णी, ज्ञानेश्वर वाघ यांनी ‘निर्भया’साठी गीतलेखन केलं असून, संगीतक्षेत्रातील आघाडीच्या गायकांनी त्या गायल्या आहेत. आनंद बच्छाव यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. संतोष हुदलीकर यांनी ‘निर्भया’ची कथा लिहिली आहे, तर पटकथा-संवाद डॉ. मुरलीधर भावसार यांचे आहेत. स्मिता जयकर, किशोर महाबोले, अनिकेत केळकर, अभिजीत कुलकर्णी, ओंकार कर्वे आदी कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. नितीन पाटील या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. कॅमेरामन मनिष पटेल यांनी छायांकन केलं असून, विनोद चौरसिया यांनी संकलनाची बाजू सांभाळली आहे.