14 वर्ष ब्रेक घेतल्यानंतर निवेदिता सराफ यांनी पुन्हा का सुरु केलं काम?; 'या' एका गोष्टीमुळे केलं कमबॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 16:02 IST2023-10-17T15:50:57+5:302023-10-17T16:02:08+5:30
Nivedita saraf: 'या' एका कारणामुळे वयाच्या 58 व्या वर्षीही निवेदिता सराफ करतात काम

14 वर्ष ब्रेक घेतल्यानंतर निवेदिता सराफ यांनी पुन्हा का सुरु केलं काम?; 'या' एका गोष्टीमुळे केलं कमबॅक
मराठी कलाविश्वातील गाजलेलं नाव म्हणजे अभिनेत्री निवेदिता सराफ. आजवरच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या निवेदिता सराफ (Nivedita saraf) सध्या छोट्या पडद्यावर वावरताना दिसत आहेत. भाग्य दिले तू मला या मालिकेत त्या महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. विशेष म्हणजे निवेदिता सराफ यांनी जवळपास १४ वर्ष इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला होता. परंतु, १४ वर्षानंतर पुन्हा कमबॅक केल्यानंतरही त्यांना प्रेक्षकांनी तितकचं प्रेम दिलं. मात्र, एवढा मोठा ब्रेक घेतल्यानंतर या वयात त्या का काम करतात? असा प्रश्न अनेकांना पडतो. या प्रश्नाचं उत्तर त्यांनी अलिकडेच एका मुलाखतीमध्ये दिले आहे.
'मी १४ वर्ष इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला होता. मी त्यावेळी पूर्णपणे घर सांभाळलं. मुळात मी कॉम्पिटिशन हा प्रकारच मानत नाही. मी आता अशा स्टेजला आलीये जिथे मला करिअर करायचं नाहीये.मला पैसाच कमवला पाहिजे किंवा स्पर्धाच केली पाहिजे असं आता माझं अजिबात नाहीये. त्यामुळे आता मी जे काम करते ते फक्त आत्मिक समाधानासाठी करते,' असं निवेदिता सराफ म्हणाल्या.
दरम्यान, निवेदिता सराफ यांनी मराठी सिनेसृष्टी तर गाजवलीच आहे. परंतु, काही हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. त्यांनी 1984 साली 'ये जो है जिंदगी','केसरी नंदन','सपनो से भरे नैना' या हिंदी मालिकांमध्ये काम केलं होतं. तर 'किंग अंकल', 'सर आँखो पर', 'जायदाद' या हिंदी सिनेमातही त्या झळकल्या आहेत.