नेहा जोशी झळकणार आता या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2016 11:15 AM2016-12-13T11:15:06+5:302016-12-13T12:21:36+5:30
का रे दुरावा या मालिकेतून अभिनेत्री नेहा जोशी प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. या मालिकेत नेहा निगेटिव्ह भूमिकेत पाहायला मिळाली ...
ा रे दुरावा या मालिकेतून अभिनेत्री नेहा जोशी प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. या मालिकेत नेहा निगेटिव्ह भूमिकेत पाहायला मिळाली होती. मात्र तिची ही निगेटिव्ह भूमिकादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता प्रेक्षकांची ही लाडकी खलनायिका लवकरच लघुपटात पाहायला मिळणार असल्याचे समजत आहे. या लघुपटाचे नाव आणि तिची भूमिका अदयाप ही गुलदस्त्यात आहे. तसेच तिच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची गोष्ट आहे. नेहा लघुपटासोबतच आणखी एका चित्रपटातदेखील झळकणार आहे. हा चित्रपट ऐतिहासिक असणार असल्याचे कळत आहे. तसेच या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता प्रसाद ओक, निखिल राऊत, आस्ताद काळे, प्रविण तरडे, मृणाल देव कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे, चिन्मय मांडलेकर असे तगडे कलाकारदेखील पाहायला मिळणार असल्याचे समजत आहे. हा एक बिगबजेट चित्रपट आहे. त्यामुळे सध्या तर नेहाची गाडी सुसाट निघाली असल्याचे दिसत आहे. मात्र नेहाची या चित्रपटात काय भूमिका असणार आहे अदयापदेखील कळाले नाही. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असून, हा चित्रपट २०१७ च्या वर्षाअखेरीस प्रदर्शित होणार असल्याचे समजत आहे. नेहाने यापूर्वी अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. ऊन पाऊस या मालिकेबरोबरच तिने एका पेक्षा एक अप्सरा अाली हा रियालिटी शोदेखील केला आहे. तसेच वाडा चिरबंदी या नाटकाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांनी रंगभूमीवर दिसली आहे. त्याचबरोबर झेंडा, सुंदर माझे घर, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं अशा अनेक चित्रपटातून तिने आपल्या अभिनयाची जादू दाखविली आहे.