​ दंगलचा खलनायक दिसणार आता काबिल चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2017 12:33 PM2017-01-11T12:33:42+5:302017-01-11T12:33:42+5:30

दंगल चित्रपटात एका कुस्ती प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये झळकलेला अभिनेता गिरीश कुलकर्णी पुन्हा एकदा आणखी एका बॉलिवूड चित्रपटामध्ये दिसणार असल्याचे समजतेय. ...

Now a villain in the movie will be seen in a Kabul movie | ​ दंगलचा खलनायक दिसणार आता काबिल चित्रपटात

​ दंगलचा खलनायक दिसणार आता काबिल चित्रपटात

googlenewsNext
गल चित्रपटात एका कुस्ती प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये झळकलेला अभिनेता गिरीश कुलकर्णी पुन्हा एकदा आणखी एका बॉलिवूड चित्रपटामध्ये दिसणार असल्याचे समजतेय. हृतिक रोशनची मुख्य भूमिका असणाºया आगामी काबिल या चित्रपटात एका पोलीस अधिकाºयाच्या भूमिकेत दिसणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता गिरीश कुलकणीर्ने दंगल या चित्रपटामध्ये साकारलेल्या एका प्रशिक्षकाच्या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगचीच दाद दिली होती.
दरम्यान काबिल या चित्रपटातील भूमिकेबद्दल एका मुलाखतीत बोलताना गिरीश कुलकर्णी म्हणाले की, मला साचेबद्ध भूमिका करायला आवडत नाहीत. त्यामुळे अग्ली या चित्रपटात पोलिसाची व्यक्तिरेखा साकारल्यानंतर पुन्हा एकदा पोलिसाची भूमिका साकारायची नाही असे मी ठरवलेच होते. पण, राकेशजींबद्दल (राकेश रोशन) माज्या मनात फार आदर असल्यामुळे मी त्यांचा प्रस्ताव नाकारु शकलो नाही. दंगल या चित्रपटामध्ये गिरीशने एक नकारात्मक छटा असलेली भूमिका साकारल्यामुळे आमिरच्या काही चाहत्यांच्या मनात तर गिरीशसाठी रागाची भावनाही निर्माण झाली आहे. याविषयीचा गिरीश कुलकणीर्ने त्याचा अनुभवही शेअर केला. तुम्ही विश्वास नाही ठेवणार पण, दंगलचे दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा मुलगा माज्याजवळ आला आणि त्याने माज्या पोटात ठोसा मारत म्हणाला की आमिर काकांना तुम्ही एका खोलीत बंद करुन शिक्षा देण्याची हिंमत तरी कशी केली?. मी जिथेही जातो तिथे लहान मुलं माज्यापासून दूर पळतात. काही मोठी माणसं तर माज्याकडे रागाचा कटाक्ष टाकतात, असे गिरीशने सांगितले आहे. २५ जानेवारीला हृतिकचा काबिल हा चित्रपट प्रदर्शित होत आहे तर त्याच दिवशी शाहरुख खानचा रईस हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Now a villain in the movie will be seen in a Kabul movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.