सुबोध भावे आणि दिप्ती देवीच्या ‘कंडिशन्स अप्लाय’ने जिंकली प्रेक्षकांची मने
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2017 09:14 AM2017-07-10T09:14:56+5:302017-07-10T14:44:56+5:30
आजच्या तरुण पिढीचे जगणं मांडणाऱ्या ‘कंडिशन्स अप्लाय’ या चित्रपटाला तरुण वर्गाची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...
आ च्या तरुण पिढीचे जगणं मांडणाऱ्या ‘कंडिशन्स अप्लाय’ या चित्रपटाला तरुण वर्गाची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. साधी सोपी कथा, कलाकारांचा दमदार अभिनय, श्रवणीय संगीत या चित्रपटाच्या जमेच्या बाजू ठरल्या आहेत.
प्रेमात पडलेल्या आणि नात्यात गोंधळलेल्या अभय आणि स्वराची गोष्ट ‘कंडिशन्स अप्लाय’ चित्रपटामध्ये असून त्यांच्या नात्याची वाटचाल अधोरेखित करण्यात आली आहे. दोनजण एकत्र राहण्याचा निर्णय घेतात. सुरुवातीच्या काळात हवाहवासा वाटणारा एकमेकांचा सहवास कालांतराने कोणती वळण घेतो हे दाखवतानाच नात्यांमध्ये अपेक्षांच्या ओझ्यामुळे होणाऱ्या परिणांमावर 'कंडिशन्स अप्लाय’मध्ये भाष्य करण्यात आले आहे.
चांगली कलाकृती बनली की प्रेक्षक तिला मनापासून दाद देतातच. संजय पवार यांचे लेखन, गिरीश मोहिते यांचे दिग्दर्शन, सुबोध भावे, दिप्ती देवी, अतुल परचुरे, अतिशा नाईक, मिलिंद फाटक, राजन ताम्हाणे, डॉ. उत्कर्षा नाईक, विनीत शर्मा या कलाकारांच्या अभिनयाने सजलेला 'कंडिशन्स अप्लाय’ प्रेक्षकांची मने जिंकतो आहे.
संवाद, सहवास यातून नाती रुजतात. पण व्हॅाटसअप, फेसबुकच्या जमान्यात त्यांच्याही व्याख्या बदलत चालल्या आहेत. यातूनच लिव्ह इन रिलेशनशिपचा पर्याय आजची पिढी बेधडकपणे स्वीकारू लागली आहे. प्रेमाच्या याच नव्या कल्पनांचा, प्रवाहाचा वेध घेणारा कंडिशन्स अप्लाय-अटी लागू हा चित्रपट आहे. अभय आणि स्वरा हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि लग्नाच्या बंधनात न अडकता एकत्र राहण्याचा निर्णय घेतात. मात्र हा निर्णय घेताना ते एकमेकांवर आणि स्वत:वर कोणत्या अटी घालतात. या अटीमुळे त्यांच्या नात्यावर काही परिणाम होतो का? हे सांगू पाहणारा हा सिनेमा आहे.
Also Read : दिप्ती देवी बनली रेडिओ जॉकी